फक्त 10 रुपयांत गाजराची वडी किंवा बर्फी अगदी निराळ्या पद्धतीने खवा न वापरता
Carrot Vadi Carrot Burfi Gajrachi Barfi or Vadi without Khoya Recipe in Marathi
आता गाजराचा सीझन आहे बाजारात गाजर बऱ्याच प्रमाणात येत आहेत. गाजर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. गाजरांपासून आपण हलवा, चटणी, पचडी व भाजी कशी बनवायची ते पाहिले. आता आपण गाजरापासून वडी किंवा बर्फी कशी बनवायची ते पाहूया. गाजराची बर्फी किंवा बनवायला अगदी सोप्या आहेत व झटपट होणाऱ्या आहेत. तसेच स्वस्त व मस्त गाजरांच्या वड्या खूप छान लागतात.
The Marathi language video Carrot Vadi Carrot Burfi Gajrachi Barfi or Vadi without Khoya be seen on our YouTube Channel of Carrot Vadi Carrot Burfi Gajrachi Barfi or Vadi without Khoya
गाजराची वडी किंवा बर्फी बनवताना गारज किसून घेतले मग रवा भाजून घेतला. तसेच खवा न वापरता अगदी झटपट वडी किंवा बर्फी बनवली आहे.
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: 4 जाणसाठी
साहित्य:
½ वाटी रवा
2 वाट्या ताज्या लाल रंगाच्या कीस
2 टे तूप
½ वाटी दूध
1 वाटी साखर
¼ टी स्पून वेलची पावडर
2 टे स्पून मिल्क पावडर
ड्रायफ्रूट सजावटसाठी
कृती: प्रथम गाजर स्वच्छ धुवून सोलून किसून घ्या. नॉनस्टिक पॅनमध्ये राव चांगला गुलाबी रंगावर भाजून घ्या व बाजूला काढून ठेवा. स्टीलच्या ट्रेला तूप लावून घ्या.
मग त्याच पॅनमध्ये तूप गरम करून त्यामध्ये किसलेले गाजर घालून चांगले परतून घ्या. गाजरातील पाण्याचा अंश गेला पाहिजे. मग त्यामध्ये दूध घालून 2 मिनिट झाकण ठेवून वाफवून घ्या. झाकण काढून मग त्यामध्ये साखर घालून मिक्स करून साखर पूर्ण विरघळू द्या.
साखर विरघल्यावर त्यामध्ये भाजलेला रवा घालून मिक्स करून घट्ट होईपर्यन्त आटवून घ्या. मिश्रण घट्ट झालेकी तूप लावलेल्या ट्रेमध्ये मिश्रण काढून घ्या. मिश्रण एकसारखे करून घेऊन थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापून सर्व्ह करा.