आपण आता पर्यन्त बऱ्याच केकच्या रेसीपी पाहिल्या. आपण कधी कुकरमध्ये तर ओव्हन मध्ये किंवा पॅनमध्ये केक कसे बनवायचे पाहिले तर आता आपण कढईमद्धे चॉकलेट केक कसा बनवायचा ते पाहूया.
The Marathi language video Chocolate Cake in Kadai without oven be seen on our YouTube Channel of Chocolate Cake without egg without Oven in Kadai
कढईमद्धे चॉकलेट केक बनवायला अगदी सोपा आहे. बऱ्याच वेळा असे होते की आपल्याला केक बनवायचा आहे तर ओव्हन नाही किंवा लाईट गेले तर अश्या वेळी हा सोपा उपाय आहे. आपण आपला केक कढईमद्धे बेक करू शकतो. तो सुद्धा अगदी बेकरी सारखा होतो.
चॉकलेट केक कढई मधील बिना अंड्याचा बिना कुकर किंवा ओव्हन कसा बनवायचा.
बनवण्यासाठी वेळ: 15 मिनिट
बेकिंग वेळ: 40-45 मिनिट
वाढणी: 6 जणसाठी
साहीत्य:
1 कप मैदा
1 कप रवा
½ कप दूध
½ कप पाणी
¼ कप तेल
एक चिमूट मीठ
2 टे स्पून दही
1 कप साखर
¼ कप चॉकलेट बेस (किसून)
2 टे स्पून चॉकलेट (छोटे तुकडे करून)
1 टी स्पून बेकिंग पावडर
½ टी स्पून बेकिंग सोडा
1 टी स्पून व्हनीला एसेन्स
ड्राय फ्रूट सजावटीसाठी
1 टी स्पून तेल कढईला लावण्यासाठी
कृती: प्रथम एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये पाणी, दूध, तेल, साखर व मीठ घालून साखर विरघले पर्यन्त चांगले फेटून घ्या. मग त्यामध्ये मैदा घालून मिक्स करून घ्या. नंतर त्यामध्ये रवा घालून मिक्स करून घेऊन त्यावर झाकण ठेवून 10-15 मिनिट बाजूला ठेवा.
रवा चांगला भिजला की त्यामध्ये किसलेले चॉकलेट, चॉकलेट तुकडे, व्हनीला एसेन्स घालून मिक्स करून घ्या. आता अगदी शेवटी त्यामध्ये बेकिंग पावडर घालून मिक्स करा मग त्यामध्ये बेकिंग सोडा घालून सोडया वरती एक चमचा पाणी घालून मग हळुवार पणे मिक्स करा.
जाड बुडाची कढई घेऊन त्याला आतून थोडेसे तेल लाऊन त्यावर मध्य भागी बटर पेपर लावून परत बटर पेपरवर परत अगदी थोडेसे तेल लाऊन घ्या. मग त्यामध्ये बनवलेले केकचे मिश्रण ओता. त्यावर झाकण ठेवा व मंद विस्तवावर केक बेक करायला ठेवा. केक प्रथम 15 मिनिट बेक करा मग झाकण काढून त्यावर ड्रायफ्रूटने सजवून परत झाकण ठेवून 20-25 मिनिट बेक करा. केक बेक झाला आहेकी नाही ते सूरीनि तपासून पहा. केक बेक झाला असेलतर विस्तव बंद करून 10 मिनिट कढई तशीच ठेवा. 10 मिनिट झालवर केक उलटा करून बटर पेपर काढून घेऊन केक कापून सर्व्ह करा.