खुसखुशीत टेस्टी मेथी मसाला पुरी मुलांसाठी
Crispy Methi Masala Puri For Kids Recipe In Marathi
मेथी ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. मेथीमद्धे रक्त शुद्ध करण्याचा गुण आहे. आपण भाजी किंवा आमटिला मेथीची फोडणी दिली तर ती रुचकर व स्वादिष्ट लागले. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने मेथी खूप गुणकारी आहे. मेथी वायुला शांत करणारी कफनाशक व ज्वरनाशक आहे. तसेच ती उष्ण, कडवट, दीपक व पौष्टिक आहे. मेथी चमका येणे, कंबर दुखणे ह्यावर गुणकारी आहे. मेथी वातावर खूप गुणकारी आहे. त्यामुळे मेथी खाणे ही किती फायदेशीर आहे.
The Marathi language video Crispy Methi Masala Puri For Kids be seen on our YouTube Channel of Crispy Methi Masala Puri For Kids
मेथीची भाजी कडू लागते. म्हणून काही लोक खात नाहीत. जर ती विविध पदार्थ बनवून खाली तर फायदेशीर आहे.
मेथीच्या आपण पुऱ्या कश्या करायच्या ते पाहू या. मेथीच्या पुऱ्या करताना आले-लसूण, लाल मिरची पावडर, ओवा, तीळ व बेसन वापरले आहे. त्यामुळे ती खूप टेस्टी व खुशखुशीत लागते.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जाणसाठी
साहीत्य:
2 कप गव्हाचे पीठ
2 टे स्पून बेसन
½ टी स्पून ओवा किंवा तीळ
¼ टी स्पून हळद
½ टी स्पून लाल मिरची पावडर
1 टे स्पून आल-लसूण हिरवी मिरची
2 टे स्पून मेथी पाने (चिरून)
¾ टी स्पून मीठ
2 टे स्पून तेलाचे मोहन (गरम)
¾ वाटी पाणी
कृती: प्रथम मेथी धुवून चिरून घ्या. आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट बनवून घ्या.
एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये गव्हाचे पीठ, बेसन, आल-लसूण-हिरवी मिरची पावडर, हळद, मेथी, मीठ व तेलाचे कडकडीत मोहन, ओवा किंवा तीळ घालून मिक्स करून पाणी वापरुन घट्ट पीठ मळून घ्या. मळलेले पीठ 10 मिनिट बाजूला ठेवा.
मग मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून त्याचा पुऱ्या लाटून घ्या. एका कढईमद्धे तेल गरम करून त्यामध्ये पुऱ्या तळून घ्या.
गरम गरम पुऱ्या टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.