डलगोना कॉफी केक एगलेस बिना ओव्हन व बटर
Dalgona Cake Eggless Without Oven & Butter Recipe In Marathi
सध्या डलगोना केक हा इंटरनेटवर खूप व्हायरल झाला आहे. डलगोना केक ही एक वेगळी रेसीपी आहे. तसेच खूप टेस्टी लागते. डलगोना केक हा कॉफी पासून तयार केला जातो. बनवायला अगदी सोपा आहे व झटपट होणारा आहे. आपण डेझर्ट म्हणून किंवा दुपारी चहा बरोबर सर्व्ह करू शकतो.
डलगोना केक बनवताना अंडे वापरले नाही तसेच बटर किंवा ओव्हन सुद्धा वापरला नाही साध्य हिंडालीयमच्या भांड्यात बनवला आहे.
डलगोना केक बनवताना कॉफी व पाणी चांगले मिक्स करून घेतले आहे तसेच त्याचे आयसिंग करताना कॉफी व पीठ साखर वापरली आहे. आता नाताळ म्हणजेच क्रिमसचा सीझन येत आहे तेव्हा अश्या प्रकारचा केक बनवू शकता.
The Marathi language video Dalgona Cake Eggless Without Oven & Butter be seen on our YouTube Channel of Dalgona Cake Eggless Without Oven & Butter
बनवण्यासाठी वेळ: 15 मिनिट
बेकिंग वेळ: 40 मिनिट
वाढणी: 4 जाणसाठी
साहीत्य: केक बनवण्यासाठी:
1 कप मैदा
½ कप पिठीसाखर
¼ कप तेल
½ कप दूध
1 टी स्पून बेकिंग पावडर
¼ टी स्पून बेकिंग सोडा
¼ टी स्पून व्हनीला एसेन्स
1 टी स्पून कॉफी
1 टी स्पून पिठीसाखर
1 टी स्पून गरम पाणी
आयसिंग करण्यासाठी:
2 ½ टे स्पून कॉफी
4 टे स्पून पिठी साखर
2 टे स्पून गरम पाणी
कृती: प्रथम मैदा, बेकिंग पावडर बेकिंग सोडा चाळून घ्या. एका छोट्या बाउलमध्ये कॉफी, पिठीसाखर व पाणी चांगले मिक्स करून घ्या.
एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये तेल व पिठीसाखर चांगले फेटून घ्या. मग त्यामध्ये चाळलेला मैदा, मिक्स केलेली कॉफी, व्हनीला एसेन्स, घालून मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये हळू हळू दूध घालून मिक्स करून घ्या.
एका बाजूला हिंडालियमचे भांडे गरम करायला ठेवा किंवा मोठ्या आकाराची कढई गरम करायला ठेवली तरी चालेल. त्यामध्ये एक छोटा स्टँड ठेवा. भांडे चांगले गरम होऊ द्या. केकच्या भांड्याला तेल लावून मग मैदा लावून घ्या. व बाजूला ठेवा.
केकचे मिश्रण तयार झालेकी केकच्या भांड्यात ओता व एकदा हळुवार पणे ओट्यावर आपटा म्हणजे जर मिश्रणात जर हवा असेलतर निघून जाईन. आता भांडे गरम करायला ठेवलेल्या भांड्यात ठेवा भांड्यावर झाकण ठेवा बाजूनी वाफ जाता कामा नये. मंद विस्तवावर 40-45 मिनिट बेक करायला ठेवा. 40 मिनिट झाल्यावर चेक करून पहा. केक तयार झाला की विस्तव बंद करा. भांडे तसेच राहू द्या. 5-7 मिनिट झाल्यावर भांडे बाहेर काढा.केक थंड होऊ द्या. मग त्याचा वरचा फूगिर भाग कापून घ्या.
आयसिंग करण्यासाठी कॉफी, पिठीसाखर व गरम पाणी चांगले मिक्स करून घेऊन फ्रीजमध्ये 10 मिनिट ठेवा. मग फ्रीज मधून काढून केकवर आयसिंग करा. वरतून चॉकलेटनि किंवा आवडेल तशी सजावट करा.