सोपी टेस्टी आरोग्यदाई गाजर मटर भाजी रेसीपी
Easy Nutritious Gajar Matar (Carrot Green Peas) Bhaji In Marathi
गाजर मटार भाजी बनवायला अगदी सोपी आहे तसेच झटपट बनणारी आहे. मुले गाजर खायचा कंटाळा करतात तर अशी पौस्टिक भाजी बनवता येते. गाजर मटार भाजी दिसायला सुद्धा आकर्षक दिसते.
The Marathi language video Easy Nutritious Gajar Matar (Carrot Green Peas) Bhaji be seen on our YouTube Channel of Easy Nutritious Gajar Matar (Carrot Green Peas) Bhaji
गाजर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे.तसेच मटार सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. आता मटार व गाजर चा सीझन चालू आहे तर त्यापासून आपण नानाविध पदार्थ बनवू शकतो.
गाजर मटार भाजी बनवताना फक्त फोडणी देवून लाल मिरची पावडर व थोडा गरम मसाला वापरला आहे. तसेच लिंबुरस किंवा आमचूर पावडर घालून टेस्ट छान येते. आपण चपाती बरोबर किंवा पराठा बरोबर सर्व्ह करू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 15 मिनिट
वाढणी: 2 जनासाठी
साहीत्य:
1 कप गाजर तुकडे
½ कप मटार दाणे
½ टी स्पून लाल मिरची पावडर
½ टी स्पून गरम मसाला
½ टी स्पून धने-जिरे पावडर
½ टी स्पून आमचूर पावडर किंवा लिंबुरस
मीठ चवीने
फोडणी करीता:
1 टी स्पून तेल
½ टी स्पून जिरे
½ टी स्पून हळद
सजावटीसाठी:
कोथबिर व ओला नारळ
कृती: गाजर धुवून, सोलून त्याच्या गोल गोल चकत्या करून घ्या. कोथबिर धुवून चिरून घ्या.
कढईमद्धे तेल गरम करून त्यामध्ये जिरे, हळद, चिरलेले गाजर, मटार घालून 3-4 मिनिट मंद विस्तवावर शिजवून घ्या.
मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, गरम मसाला, धने-जिरे पावडर व मीठ घालून मिक्स करून कढईवर झाकण ठेवा. झाकणावर थोडेसे पाणी घालून 4-5 मिनिट मंद विस्तवावर भाजी शीजवून घ्या. भाजी शिजल्यावर झाकण काढून लिंबुरस किंवा आमचूर पावडर घालून मिक्स करून कोथबिर घाला.
गरम गरम भाजी सर्व्ह करताना कोथबिर व ओला नारळ घालून सजवून भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर सर्व्ह करा.