गाजर हलवा गाजर नकिसता रेस्टॉरंट किंवा लग्न समारंभ स्टाईल अगदी निराळी पद्धत इन मराठी
Gajar Halwa without Grated Restaurant Or Marriage Party Style In Marathi
आता मस्त थंडीचा सीझन चालू झाला बाजारात मस्त ताजी लाल चुटुक गाजर आली की आपले मन अगदी मोहून जाते. गाजरचा हलवा ही डिश सर्व ठिकाणी लोकप्रिय आहे कोणत्या सुद्धा प्रांतात जा तिथे गाजर हलवा बनवतात तसेच लग्न, मुंज, कोणताही समारंभ असो किंवा सणवार असो किंवा जेवणानंतर स्वीट डिश म्हणून सुद्धा बनवला जातो.
The Marathi language video Gajar Halwa without Grated Restaurant Or Marriage Party Style be seen on our YouTube Channel of Gajar Halwa without Grated Restaurant Or Marriage Party Style
गाजर हलवा दिसायला अगदी आकर्षक दिसतो व त्याची टेस्ट अप्रतिम लागते. आपण लग्न समारंभ किंवा कोणत्या सुद्धा पार्टीला गेलो तर गाजर हलवा ही रिच डिश असते. तेव्हा ते मोठ्या प्रमाणात बनवतात पण ते इतक्या प्रमाणात गाजर कसे किसणार त्यासाठी सोपी ट्रिक आहे. तसेच त्यांच्या हलव्याला खूप चकाकी येते ती चकाकी कशी येते व त्यांच्या गाजर हलव्याची टेस्ट खूप निराळी लागते. ह्या सर्व ट्रिक आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत.
गाजर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. गाजर ही मधुर, तिक्ष, कडूसर, गरम हलके असते. त्यामध्ये विटामीन ए भरपूर प्रमाणात असते ते आपल्या त्वचासाठी उपयुक्त असते. गाजरामद्धे प्रोटिन, चरबी, कॅल्शियम, फॉसफरस, गंधक, स्टार्च विपुल प्रमाणात असते.
बनवण्यासाठी वेळ: 40 मिनिट
वाढणी: 5-6 जणांसाठी
साहीत्य:
500 ग्राम ताजी लाल गाजर
500 मिलिलीटर दूध (क्रीम)
½ वाटी (मध्यम आकाराची) साखर
½ टी स्पून वेलची पावडर
1 टे स्पून साजूक तूप
¼ वाटी ड्रायफ्रूट तुकडे (काजू बदाम किसमिस)
कृती: प्रथम गाजर स्वच्छ धुवून सोलून त्याच्या गोल गोल चकत्या करून घ्या. काजू बदाम तुकडे करून घ्या. वेलची पावडर करून घ्या.
कुकरमद्धे गाजर व दूध घेऊन झाकण लावा व मध्यम विस्तवावर दोन शिट्या काढून घ्या. दोन शिट्या काढल्या की कुकर थंड करायला ठेवा. कुकरचे झाकण उघडून डावाने गाजर मॅश्ड करून घ्या. मग परत कुकर विस्तवावर ठेवून मध्यम विस्तवावर दूध आटवून घ्या.
मिश्रण आटले की त्यामध्ये वेलची पावडर व साखर घालून थोडे घट्ट होई पर्यन्त आटवून घ्या.
एका कढईमद्धे साजूक तूप गरम करून त्यामध्ये काजू बदाम व किसमिस घालून एक मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये गाजरचे मिश्रण घालून मिक्स करून 2-3 मिनिट छान परतून घ्या. मग सरविंग बाउलमध्ये काढून ड्रायफ्रूटने सजवा. गरम गरम गाजर हलवा सर्व्ह करा.