बेकरीसारखा बिना अंड्याचा गहू व गाजराचा केक कुकरमध्ये बनवा
Gajar Ka Cake Eggless Wheat Flour Carrot Cake in Pressure Cooker Recipe In Marathi
थंडीचा सीझन आला की आपल्याला मार्केटमध्ये छान लाल चुटुक गाजर मिळतात. मग कोणाला मोह होणार नाही जरी घरी गाजर असतील तरीसुद्धा आपण परत विकत घेतो. मग घरी आपल्यावर लाल चुटुक गाजरांचे काय काय पदार्थ बनवायचे ह्याचा विचार करतो कींव लगेच यूट्यूब चालू करून सर्च करतो.
The Marathi language video Gajar Ka Cake Eggless Wheat Flour Carrot Cake in Pressure Cooker be seen on our YouTube Channel of Gajar Ka Cake Eggless Wheat Flour Carrot Cake in Pressure Cooker
आता पर्यन्त आपण गाजर न किसता हलवा कसा बनवायचा तसेच गाजर वापरुन खीर कशी बनवायची गाजराची पचडी कशी बनवायची ते पाहिले. गाजर मटार वापरुन भाजी कशी बनवायची ते सुद्धा पाहिले.
गाजर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे त्याच्या सेवनाने आपली त्वचा व डोळे चांगले राहतात. आपले डोळे व त्वचा साठी लागणारे योग्य तत्व त्याच्या मध्ये आहेत. मुले गाजर खायचा कंटाळा करतात. मग अश्या प्रकारे आपण विविध पदार्थ बनवू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 15 मिनिट
बेकिंग वेळ: 45 मिनिट
साहीत्य:
1 कप गव्हाचे पीठ
1 कप मैदा
1 कप गाजर (किसून)
½ टी स्पून दालचीनी पावडर
1 चिमूट मीठ
1 कप बटर
¾ कप दही
¼ कप दूध
1 कप पिठीसाखर
2 टे स्पून तेल
1 टी स्पून बेकिंग पावडर
1 टी स्पून बेकिंग सोडा
¼ टी स्पून वनीला एसेन्स
ड्रायफ्रूट सजावटीसाठी
कृती: गाजर धुवून, सोलून किसून घ्या. प्रथम गव्हाचे पीठ, मैदा, दालचीनी पावडर, मीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा चाळणीने चाळून घ्या.
कुकर गरम करायला ठेवा. कुकर गरम झालाकी त्यामध्ये मीठ घालून एक स्टँड ठेवा. केकच्या भांड्याला थोडे बटर व मैदा लावून घ्या.
एका बाउलमध्ये बटर, पिठीसाखर, दही, तेल व दूध मिक्स करून एग बीटरनी चांगले फेटून घ्या. मग त्यामध्ये केसलेले गाजर, चाळलेला मैदा घालून हलक्या हातानी मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये वनीला एसेन्स घाला. मिश्रण जास्त घट्ट वाटले तर थोडेसे दूध घालून मिक्स करून घ्या. तयार झालेले मिश्रण केकच्या भांड्यात घालून एकदा टॅप करून त्यावर ड्रायफ्रूटने सजवा.
कुकर मध्ये स्टँडवर केकचे भांडे ठेवा व कुकरच्या झाकणाची शिट्टी व रिंग काढून झाकण लावून घ्या. मग 1 मिनिट विस्तव मोठा करून मग कमी करा. मग मंद विस्तवावर 40-45 मिनिट केक बेक करून घ्या. केक बेक झालाकी नाही ते झाकण काढून सुरीने चेक करा. केक झाला असेल तर विस्तव बंद करून 10 मिनिट केक कुकरमध्येच ठेवा.
मग 10 मिनिट नंतर कुकरमधून केक बाहेर काढून थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर कापून मग सर्व्ह करा.