आले पाक आल्याची वडी आल्याची बर्फी संधिवात, सर्दी व खोकलासाठी
Ginger Barfi Alyachi Vadi Aale Pak Vadi Recipe For Cold And Cough In Marathi
आल ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. सर्दी खोकला झाला किंवा सांधे दुखत असतील तर त्यावर घरगुती उपाय म्हणजे आले पाक म्हणजेच आल्याच्या वड्या किंवा आदरक ची बर्फी.
आम्ही शाळेत होतो तेव्हा मधल्या सुटीत व आजी शाळेच्या बाहेर बरणीमद्धे आलेपाक बनवून विकायला ठेवायची बऱ्याच मुली तिच्या कडून विकत घ्यायच्या. तसेच ट्रेनमध्ये किंवा बसस्टॉप वर बरेच वेळा आले पाक असे ओरडत त्या वड्या विकत यायला कोणी तरी यायचे.
The Marathi language video Ginger Barfi Alyachi Vadi Aale Pak Vadi be seen on our YouTube Channel of Ginger Barfi Alyachi Vadi Aale Pak Vadi
आले पाक किंवा आल्याच्या वड्या बनवायला खूप सोप्या व झटपट होणाऱ्या आहेत. आता थंडीचा सीझन चालू झाला की अश्या प्रकारच्या आल्याच्या वड्या बनवून ठेवाव्या. मग सर्दी खोकला झाला कीव घसा दुखत असला तर पटकन घरगुती उपाय म्हणजे ही वडी तोंडात टाकता येते.
आले पाक बनवताना साखर, दूध व थोडेसे क्रीम व बदाम पावडर वापरली आहे त्यामुळे त्याची टेस्ट खूप छान लागते तसेच ती तिखट लागत नाही मग मुले सुद्धा आवडीने खातात.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 30-40 वड्या बनतात
साहीत्य:
1 वाटी आले (बारीक चिरून)
2 वाट्या साखर
1 वाटी दूध
1 टे स्पून फ्रेश क्रीम
2 चमचे तूप
6-7 बदाम (बारीक कुटून)
1 ½ टे स्पून पिठीसाखर
कृती: प्रथम आल धुवून साल काढून परत धुवून घ्या. मग त्याचे बारीक तुकडे करून घ्या.बदाम कुटून घ्या. स्टीलच्या ट्रेला किंवा ताटलीला तूप लाऊन घ्या.
मिक्सरच्या भांड्यात चिरलेले आल्याचे तुकडे, दूध व क्रीम घालून वाटून घ्या.
नॉन स्टिक पॅनमध्ये किंवा कढईमद्धे वाटलेले मिश्रण काढून घेऊन त्यामध्ये साखर घालून मध्यम विस्तवावर मिश्रण आटवून घ्या. मिश्रण घट्ट व्हायला लागले की त्यामध्ये तूप व बदाम पावडर घालून मिक्स करून घ्या.
मग त्यामध्ये पिठीसाखर घालून मिक्स करून मिश्रण आळायला लागले की तूप लावलेल्या ट्रेमध्ये काढून घ्या. मिश्रण ट्रेमध्ये काढल्यावर एक सारखे थापुन घ्या. मिश्रण थोडे गरम असताना त्याच्या वड्या कापून घ्या.
आल्याच्या वड्या थंड झाल्याकी डब्यात भरून ठेवा.