झटपट घरच्या घरी बनवा ऑरेंज कैंडी मुलांसाठी
Home made Easy Orange Candy For Kids Recipe In Marathi
ऑरेंज कैंडी ही मुलांची आवडती डिश आहे. मुले संत्री खायचा कंटाळा करत असतील तर अश्या प्रकारची झटपट व मस्त डिश मुलांना बनवून देता येते.
आता थंडीच्या दिवसांत संत्री बाजारात बऱ्याच प्रमाणात दिसतात. नारंगी रंगाची संत्री मधुर लागतात. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहेत. संत्र्यामद्धे जीवनसत्व “ए”, “बी” “सी” व डी” असते. तसेच त्यात लोह व कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्याच्या सेवणाने रक्तवृद्धी होते, दात ए हाडे मजबूत होतात. संधीवातावर संत्री ही रामबाण उपाय समजला जातो. आपण संत्र्याचे जूस बनवतो. आपण संत्र्याची बर्फी किंवा वडी सुद्धा बनवू शकतो.
The Marathi language video Zatpat Orange Candy For Kids be seen on our YouTube Channel of Sweet Orange Candy For Kids
ऑरेंज कैंडी बनवायला सोपी झटपट होणारी आहे.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 12-15 बनतात.
साहीत्य:
2 ऑरेंज
1 कप पिठीसाखर
1 चिमूट ऑरेंज रंग
1 चिमूट शेंदेलोण मीठ
कृती: प्रथम ऑरेंज सोलून त्यामधील बिया हळुवारपणे काढा. फोडीचा शेप बदलता कामा नये.
नॉन स्टिक पण यामध्ये 6 टे स्पून पिठीसाखर घेऊन मंद विस्तवावर गरम करायला ठेवा. साखर पूर्ण विरघळून त्याचा रंग थोडा ब्राऊन आला पाहिजे म्हणजे कैरमेलाइज्ड करायचे आहे. मग त्यामध्ये ऑरेंज रंग व शेंडेलोण मीठ घालून मिक्स करून त्यामध्ये ऑरेंजच्या फोडी घोळून घ्या. विस्तव बंद करून ऑरेंजच्या फोडी एका ट्रेमध्ये वेगवेगळ्या ठेवून 10 मिनिट पंख्या खाली सुकवत ठेवा. ऑरेंजच्या फोडी मग पिठीसाखरमध्ये घोळून मग सर्व्ह करा.