आरोग्यदाई गाजराची चटणी किंवा पचडी अश्या पद्धतीने बनवा विडियो इन मराठी
Nutritious Carrot Chutney or Pachadi Recipe In Marathi
गाजराची चटणी आपण ह्या अगोदरच्या विडियो मध्ये पाहिले असेलच. पण आता आपण गाजराची अगदी निराळ्या पद्धतीने चटणी बनवणार आहोत.
The Marathi language video Nutritious Carrot Chutney or Pachadi be seen on our YouTube Channel of Nutritious Carrot Chutney or Pachadi
आता थंडीचा सीझन चालू झाला मार्केटमध्ये छान ताजी लाल चुटूक् गाजर येतात. आपल्याला त्याचा रंग व ताजेपणा मोहून टाकतो. मग आपण घरी आल्यावर गाजराचा हलवा, गाजरांची भाजी, गाजराचा पराठा किंवा गाजरांची पछडी बनवतो. आता आपण ताज्या गाजरांची चटणी बनवणार आहोत. गाजराची चटणी अगदी निराळ्या पद्धतीने बनवणार आहोत. अश्या प्रकारची चटणी आपण चपाती, डोसा किंवा इडली बरोबर सुद्धा सर्व्ह करू शकतो.
गाजर ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. गाजर ही मधुर, तिक्ष, कडूसर, गरम हलके असते. त्यामध्ये विटामीन ए भरपूर प्रमाणात असते ते आपल्या त्वचासाठी उपयुक्त असते. गाजरामद्धे प्रोटिन, चरबी, कॅल्शियम, फॉसफरस, गंधक, स्टार्च विपुल प्रमाणात असते.
बनवण्यासाठी वेळ: 15 मिनिट
वाढणी: 4 जणांसाठी
साहीत्य:
1 कप गाजर (किसून किंवा तुकडे करून)
1 टी स्पून तेल
1 टी स्पून उदीडदाळ
1 टी स्पून चनाडाळ
3 लाल सुक्या मिरच्या
2-3 लसूण पाकळ्या
2 टे स्पून ओले खोबरे (खोवून)
1 चिंच तुकडा
मीठ चवीने
फोडणी करीता:
1 टी स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1 चिमूट हिंग
5-6 कडीपत्ता पाने
कृती: गाजर धुवून सोलून तुकडे करून घ्या किंवा किसून घ्या.
एका कढईमद्धे तेल गरम करून त्यामध्ये उदीडदाळ,चनाडाळ व लाल मिरची परतून घ्या. मग त्यामध्ये लसूण घालून थोडा परतून त्यामध्ये गाजर घालून 2-3 मिनिट फ्राय करून घ्या, रंग बदलला की विस्तव बंद करून मिश्रण थोडे थंड होऊ द्या.
मिक्सरच्या भांड्यात तयार केलेले मिश्रण, ओला नारळ, मीठ व चिंच घालून चटणी वाटून घ्या. कढईमद्धे तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, एक पिंच हिंग व कडीपत्ता पाने घालून खमंग फोडणी चटणीवर घाला.
गाजराची चटणी किंवा गाजराची पचडी चपाती बरोबर किंवा पराठा बरोबर सर्व्ह करा.