परफेक्ट बिना खवा अथवा मावा ऑरेंज बर्फी किंवा संत्र्याची वडी
Perfect Orange Barfi Or Orange Vadi Without Khoya Recipe In Marathi
थंडीच्या सीझनमध्ये बाजारात संत्री आपल्याला ठीक ठिकाणी पाहायला मिळतात. संत्रे दिसायला सुंदर, स्वादाने आंबट-गोड मधुर वासाने व स्पर्शाने शीतल असणारे फळ आहे. संत्र्याच्या सेवणाने शरीरातील उष्णता दूर होते व वारंवार लागणारी तहान भगवते. ताप आला असेल तर व तसेच उन्हाळा ह्या सीझनमध्ये संत्र खाणे उत्तम असते. संत्र्याची साल सुद्धा गुणकारी आहेत ते आपण ह्या अगोदर पहिले.
The Marathi language video Perfect Orange Barfi Or Orange Vadi Without Khoya be seen on our YouTube Channel of Orange Barfi Or Orange Vadi Without Khoya
संत्र्यामद्धे जीवनसत्व “ए”, “बी” “सी” व डी” असते. तसेच त्यात लोह व कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्याच्या सेवणाने रक्तवृद्धी होते, दात ए हाडे मजबूत होतात. संधीवातावर संत्री ही रामबाण उपाय समजला जातो. आपण संत्र्याचे जूस बनवतो. आपण संत्र्याची बर्फी किंवा वडी सुद्धा बनवू शकतो.
संत्र्याची वडी बनवायला अगदी सोपी आहे. संत्रे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 15 वड्या बनतात
साहीत्य:
1 कप ओला नारळ (खोवून)
7-8 मोठ्या संत्र्याच्या पाकळ्या
4 टे स्पून साखर
2 टे स्पून मिल्क पावडर
3-4 थेंब ऑरेंज इमल्शन
1 टे स्पून पिठी साखर
1 चमचा तूप
कृती: प्रथम नारळ खोवून मिक्सरमधून थोडासा बारीक करून घ्या. मग संत्र्याच्या फोडी बिया व शीरा काढून मिक्सरमधून बारीक करून घ्या.
नॉन स्टिक पॅनमध्ये बारीक केलेला नारळ व संत्र्याचे जूस घालून 2-3 मिनिट शीजवून घ्या. मग त्यामध्ये साखर घालून घट्ट होई पर्यन्त आटवून घ्या. आता त्यामध्ये मिल्क पावडर व ऑरेंज इमल्शन घालून परत थोडे घट्ट व्हायला लागले की पिठी साखर घालून मिक्स करा.
स्टीलच्या प्लेटला तूप लावून मिश्रण प्लेट मध्ये काढून घ्या. एकसारखे करून थंड झाल्यावर काजूनी सजवून वड्या कापून घ्या.