Tasty Green Peas Pan Cake For Kids Recipe In Marathi

Tasty Green Peas Pan Cake For Kids
Tasty Green Peas Pan Cake For Kids

चटपटीत पौष्टिक हिरव्या ताज्या मटारची पॅन केक मुलांच्या नाश्त्यासाठी

Tasty Green Peas Pan Cake For Kids Recipe In Marathi

आता बाजारात छान हिरवे गार मटार मिळतात. त्या पासून आपण मस्त वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. ताज्या मटार पासून आपण पॅन केक बनवू शकतो. पॅन केक अगदी मस्त लागतात. मुले अगदी आवडीने खातात. तसेच मटारचे पॅन केक बनवायला अगदी सोपे झटपट होणारे व पौस्टिक सुद्धा आहेत कारण की त्यामध्ये आपण रवा, गाजर, शिमला मिरची, कांदा व टोमॅटो घातला आहे. तसेच ते छान कुरकुटीत लागतात. आपण टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करू शकतो.

The Marathi language video Tasty Green Peas Pan Cake For Kids be seen on our YouTube Channel of Tasty Green Peas Pan Cake For Kids

मटार मध्ये लोह, जिंक, मैंगनीज, कॉपर ही अधिक प्रमाणात असते. त्यामुळे त्याच्या सेवणाने आपल्या शरीरातील बरेच रोज कमी होतात कारण मटार मध्ये एंटीऑक्सीडेंट चे गुण आहेत. त्यामुळे आपल्या शरीराची रोग प्रतिकार शक्ति वाढते व आपण शरीर रोगासाठी लढू शकते.

बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 8-10 छोटे बनतात

साहीत्य:
1 कप हिरवे ताजे मटार
2 टे स्पून दही
6-7 लसूण पाकळ्या
1 ” आले
2 हिरव्या मिरच्या
½ कप रवा
1 टे स्पून कांदा (बारीक चिरून)
1 टे स्पून टोमॅटो (चिरून)
1 टे स्पून गाजर (चिरून)
1 टे स्पून शिमला मिरची (चिरून)
1 टे स्पून कोथबिर (चिरून)
1 टी स्पून मीठ (चवीने)
¼ टी स्पून इनो ऑर ¼ टी स्पून बेकिंग सोडा
1 टी स्पून चिली फ्लेस्क
तेल फ्राय करण्यासाठी

Tasty Green Peas Pan Cake For Kids
Tasty Green Peas Pan Cake For Kids

कृती: प्रथम मटार सोलून धुवून घ्या. कांदा, टोमॅटो, गाजर, शिमला मिरची, कोथबिर धुवून चिरून घ्या.

मिक्सरच्या भांड्यात मटार, दही, लसूण, आले, हिरवी मिरची व 2 टे स्पून पाणी घालून वाटून घ्या.

वाटलेले मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊन त्यामध्ये रवा, कांदा, टोमॅटो, गाजर, शिमला मिरची, कोथबिर, मीठ व ½ कप पाणी घालून मिक्स करून झाकून 10 मिनिट बाजूला ठेवा म्हणजे रवा चांगला फुलून येईन. रवा चांगला मुरला की त्यामध्ये इनो घालून त्यावर एक चमचा पाणी घालून हलक्या हातांनी मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये चिली फ्लेस्क घालून मिक्स करून घ्या.

नॉनस्टिक पॅन गरम करून त्यावर तेल लावून एक मोठा डाव मिश्रण घालून थोडेसे जाडसर पसरवून बाजूनी थोडेसे तेल घाला. मग दोन्ही बाजूने छान भाजून घ्या.

मटारचे पॅन केक चटणी बरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.