स्वादिष्ट कोंकणी पद्धतीने फरसबी (बिन्स) मटकी भाजी रेसीपी
Tasty Konkani Style Beans Matki Vegetable Recipe In Marathi
बिन्स म्हणजेच आपण श्रावण घेवडा किंवा फरसबी म्हणतो. श्रावण घेवड्याची भाजी आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. आता आपण बिन्स व मटकी ह्याची भाजी कशी बनवायची ते पाहूया.
The Marathi language video Tasty Konkani Style Beans Matki Vegetable be seen on our YouTube Channel of Tasty Konkani Style Beans Matki Vegetable
फरसबी वापरताना छान कोवळी वापरली तर त्याची भाजी मस्त लागते. बिन्स आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे कारण की त्यामध्ये प्रोटिन,पोट्याशीयम, कॅल्शियम, गंधक, फॉस्फरस, व लोह तसेच विटामीन ए व सी असते. मटकीची उसळ मुले आवडीने खातात. बिन्स व मटकी ह्याची भाजी खूप छान लागते. आपण चपाती किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 2 जणसाठी
साहीत्य:
1 छोटी वाटी फ्रेंच बिन्स (धुवून चिरून)
½ छोटी वाटी मोड आलेली मटकी
मीठ चवीने
½ टी स्पून लाल मिरची पावडर
¼ टी स्पून गरम मसाला
¼ टी स्पून जिरे भाजून कुटून
1 टे स्पून सुके खोबरे किसून भाजून
1 टे स्पून ओला नारळ (खोवून)
1 टे स्पून कोथबीर चिरून
फोडणी करिता:
1 टे स्पून तेल
½ टी स्पून मोहरी
½ टी स्पून जिरे
¼ टी स्पून हिंग
¼ टी स्पून हळद
कृती: पभाजी बनवताना शेंगा कोवळ्या घ्या. त्या धुवून शीरा काढून चिरून घ्या. मोड आलेली मटकी धुवून घ्या. जिरे भाजून कुटून घ्या. सुके खोबरे किसून भाजून घ्या. ओला नारळ खोवून कोथबिर धुवून चिरून घ्या.
प्रथम चरलेली फरसबी व मटकी वेगवेगळी वाफवून घ्या. फरसबी वाफवून घेतली की ती छान हिरवी राहते.
कढईमद्धे तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून मिक्स करून वाफवलेली फरसबी, मटकी व मीठ चवीने घालून लाल मिरची पावडर, गरम मसाला मग कुटलेले जिरे, भाजलेले सुके खोबरे घालून झाकण ठेवा त्यावर पाणी घाला व 5-7 मिनिट मंद विस्तवावर शिजत ठेवा.
मग झाकण काढून ओला नारळ व कोथबिर घालून मिक्स करून एक मिनिट मंद विस्तवावर वाफवून विस्तव बंद करा.
बिन्सची तयार झालेली भाजी बाउलमध्ये काढून त्यावर ओला नारळ व कोथबिर घालून मग सर्व्ह करा.