आपण पाहतो की बरेच लोक लाफिंग बुद्धा ह्यांची मूर्ती ऑफिसमध्ये किंवा घरात ठेवतात. लाफिंग बुद्धा ह्यांच्या मूर्ती वेगवेगळ्या प्रकारात असतात आपण पाहतो की कधी झोळी बरोबर, वाडग्या बरोबर, दोन्ही हात वरती, बरेच हात असलेले, हातात माळ घेऊन असे वेगवेगळ्या आकाराचे असतात व त्यातील एखादी मूर्ती आपण आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवतो. पण आपल्याला माहिती आहे का की लाफिंग बुद्धा कुठून आले किंवा ते कोण आहेत? खर म्हणजे लोक लाफिंग बुद्धा ह्याची मूर्ती गुड लक म्हणून ठेवतात.
The Marathi language video Who is laughing Buddha be seen on our YouTube Channel of History or Story of Laughing Buddha
जो नेहमी हसमुख राहतात म्हणजेच लाफिंग बुद्धा त्यांची आपण पूर्ण माहिती किंवा कहाणी पाहू या.
बौद्ध धर्मामध्ये जी व्यक्ति ज्ञान की प्राप्ति करण्यासाठी मोह माया किंवा संसार सोडून ध्यान लावण्यासाठी बाहेर पडतो व त्याची प्राप्ती मिळवतो तो खरा बुद्ध आहे असे मानले जाते.
महात्मा बुद्ध ह्याचे बरेच शिष्य होते त्यामध्ये एक शिष्य म्हणजे होतेई. असे म्हणतात की होतेई हयानी बराच अभ्यास केल्यावर त्यांना खूप हसू यायला लागले. मग त्यांनी एकच लक्ष ठेवले की लोकाना हसवायचे, खुश रहायला शिकवायचे किंवा आनंदी कसे राहायचे टे सांगायचे. होतेई जेथे जेथे जायचे तेथे तेथे ते लोकाना हसवायचे म्हणून जपान व चीन येथे लोक त्यांना हसणारा बुद्धा असे म्हणत त्यांना हाक मारत. ह्याचाच इंग्लिश अर्थ लाफिंग बुद्धा असा होतो. बौद्ध गुरु सारखे होतेई ह्याचे सुद्धा बरेच शिष्य होते. त्यांचे शिष्य बऱ्याच देशांमध्ये जाऊन लोकाना हसवत, त्यांना आनंदी रहायला शिकवत हाच त्यांचा उद्देश होता.
चीनमध्ये त्यांच्या शिष्यानि आनदी राहयचा, हसत खेळत कसे रहायचे ह्याच खूप प्रचार केला म्हणून चीनमध्ये लोक लाफिंग बुद्धा ह्यांना देव मानू लागले. तेथील लोक लाफिंग बुद्धा ह्याची मूर्ती गुड लक म्हणून घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवू लागले. आपल्या भारतात आपण भगवान कुबेर हयाना धनाचे देवता मानतो तसेच चीनमध्ये लाफिंग बुद्धा हयाना देव मानले जाते.
आपल्या घरामध्ये बरेच लोक सुख समृद्धीसाठी काहीना काही शुभ वस्तु ठेवतात त्यामुळे घरातील नकारात्मक शक्ति दूर होते व घरात सुख संपत्ति प्राप्त होते. अश्याच प्रकारे चाईनीज वास्तु शास्त्र फेंगशुईमध्ये सुद्धा अश्या काही वस्तूचे महत्व आहे. त्यामध्येच एक शुभ वस्तु म्हणजे लाफिंग बुद्धा होय. लाफिंग बुद्धा घरात ठेवल्याने बरेच फायदे होतात. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येवून सुख समृद्धी येते. लाफिंग बुद्धा ह्यांच्या विविध प्रकारच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. लाफिंग बुद्धा ह्याची मूर्ती घरात किंवा ऑफिसमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवल्यामुळे काय काय फायदे होतात ते आपण नंतरच्या भागामध्ये पाहणार आहोत.
People said that laughing buddha is very good and lucky when we gift to someone.