12 Benefits of keeping laughing Buddha at Home in Marathi
लाफिंग बुद्धाचा हसरा चेहरा म्हणजे सुख, समृद्धी व आनंदाचे दार उघडणे.
आपल्या जगामध्ये फक्त काही व्यक्ति अश्या असतील की त्यांना लाफिंग बुद्धा म्हणजे काय व ते कसे असतील ही माहीत नसेल. आजकाल घरच्या सजावटीमध्ये फेंग्शुईच्या उपायाच्या वस्तु ठेवण्याची प्रथा आहे त्यामध्ये लाफिंग बुद्धा ह्यांचा समावेश आहे. लाफिंग बुद्धा ह्याची मूर्ती जास्ती करून गिफ्ट म्हणजेच भेट म्हणून दिली जाते. लाफिंग बुद्धा ह्यांची बरीच रूप आहेत. पण सर्वात जास्त हातात पोटली घेतलेले लाफिंग बुद्धा जास्त लोकप्रिय आहेत. हातात पोटली घेतलेले लाफिंग बुद्धा आपल्याला घरोघरी पाहायला मिळतील. तसेच लोक डोळे झाकून सांगतील की हे लाफिंग बुद्धा आहेत.
The Marathi language video Financial benefit of keeping Laughing Buddha at Home be seen on our YouTube Channel of Benefits of keeping laughing buddha at home
लाफिंग बुद्धा घरात ठेवण्याचे फायदे काय आहेत. पण एक लक्षात ठेवा की लाफिंग बुद्धा आपल्याला कोणी गिफ्ट म्हणजेच भेट म्हणून दिले तर त्याचे फायदे अजून चांगले मिळतात.
लाफिंग बुद्धा ह्यांच्या 12 प्रकारच्या प्रतिमा आहेत व त्याचे 12 प्रकारचे निराळे फायदे आहेत ते काय आहेत ते आपण पाहूया.
दीर्घायु व आरोग्य ह्यासाठी हातात वु-लू घेतलेले लाफिंग बुद्धा:
लाफिंग बुद्धा ह्यांच्या हसऱ्या चेहऱ्याला आनंदाचे उघडे दार असे म्हणतात. सुख, शांती संपत्ति ह्यांचे देवता असणारे लाफिंग बुद्धा ह्यांची फक्त मूर्ती घरात ठेवली जाते त्यांची पूजा करत नाहीत. लाफिंग बुद्धा ह्यांची मूर्ती घरात ठेवल्याने घरात धन दौलत ह्याचे आगमन होते व आपल्या आरोग्याच्या तक्रारीन पासून आपण दूर राहतो. जर कोणाच्या घरात आजारी माणूस आहे व त्याचा आजार बरेच दिवसा पासून आहे व तो आजार घरातून जाण्याचे नाव घेत नाही व त्याच्या आजाराचे निदान होत नाही तर हातात वु-लू नावाचे चीनी फळ घेतलेले लाफिंग बुद्धा घरात ठेवले तर नक्कीच त्याचा फायदा होऊन आजाराचे निदान होण्यास मदत होईल. वु-लू हे फेंग्शुईचे असे गैजेट आहे की ते दीर्घायु व आरोग्य देते. पण हातात हे फळ लाफिंग बुद्धा हयानी घेतलेले असले पाहिजे तरच त्याचा प्रभाव पडेल.
लाफिंग बुद्धा ह्यांची प्रतिमा कोठे ठेवावी?
आपण घरात किंवा ऑफिसमध्ये कुठे सुद्धा लाफिंग बुद्धा ह्यांची प्रतिमा ठेवू शकतो पण जनिमीवर ठेवू नये. जर खाली ठेवायची असेल तर पाटावर ठेवावी. ड्रॉइंगरूम मध्ये ठेवावी, बेडरूम किंवा किचन मध्ये किंवा डायनिग टेबलवर ठेवू नये. तसेच लाफिंग बुद्धा ह्यांची प्रतिमा ठेवताना अश्या प्रकारे ठेवा की घरात येणाऱ्या व्यक्तीला आल्या बरोबर समोरच दिसेल.
लाफिंग बुद्धा ह्यांच्या 12 प्रकारच्या प्रतिमा आहेत.
1. दोन्ही हात वरच्या दिशेला असणारे लाफिंग बुद्धा:
ज्यांच्या घरात आर्थिक टंचाई आहे. व्यापार वृद्धी होत नाही त्यांनी लाफिंग बुद्धा ह्याची प्रतिमा ठेवावी. आपल्या साऱ्या अडचणी जाऊन आर्थिक प्रगती होईल.
2. झोपलेल्या स्थतीत असलेले लाफिंग बुद्धा:
ज्यांच्या घरी ज्या स्त्रीचे दुर्भाग्य हात धरून चालत असेल त्यांनी अश्या प्रकारची लाफिंग बुद्धा ह्यांची प्रतिमा ठेवावी. सुख मिळून सौभाग्य प्राप्ती होईल.
3. हातात धनाची झोळी घेतलेले लाफिंग बुद्धा:
अश्या प्रकारची प्रतिमा घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवल्याने धन संबंधित अडचणी दूर होऊन धनाची कधी सुद्धा कमतरता होणार नाही.
4. लहान मुलाच्या मध्ये असलेले लाफिंग बुद्धा:
ज्याना संतान प्राप्ती होत नाही व ते दुखी आहेत त्यांनी अश्या प्रकारची लाफिंग बुद्धा ह्यांची प्रतिमा ठेवावी त्यांना संतान सुख मिळेल असे म्हणतात.
5. खांद्यावर झोळी घेतलेले लाफिंग बुद्धा:
अश्या प्रकारची लाफिंग बुद्धा ह्यांची प्रतिमा घरात ठेवल्याने व्यापार वृद्धी होऊन घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईन.
6. ड्रागन बरोबर बसलेले लाफिंग बुद्धा:
अश्या प्रकारची प्रतिमा घरात ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा जाऊन सकारात्मक ऊर्जा येते. वातावरण शुद्ध होऊन नवी ऊर्जा निर्माण होते. जादू टोणा ह्या सारख्या गोष्टींचा प्रभाव होत नाही.
7. हसणारे लाफिंग बुद्धा:
अश्या प्रकारची प्रतिमा ठेवल्यामुळे घरातील वातावरण नेहमी आनंदी राहते. सुख समृद्धी राहते. घरातील मानसिक तनाव नष्ट होतो.
8. कोणत्यापण धातू पासून बनवलेले लाफिंग बुद्धा:
धातू पासून बनवलेल लाफिंग बुद्धा घरात ठेवल्याने घरातील व्यक्तीची निर्णय घेण्याची क्षमता वाढते. असमंजस स्थिति सुधारून कार्यक्षमता वाढते.
9. ध्यान लावलेले लाफिंग बुद्धा:
ज्या व्यक्तिला मानसिक शांती नाही तसेच मानसिक रोगा पासून पीडित आहे. त्यांनी अश्या प्रकारची प्रतिमा घरात ठेवावी नक्की फायदा होईल.
10. नावेमध्ये बसलेले लाफिंग बुद्धा:
ज्याना समाजात मान सन्मान पाहिजे त्यांनी अश्या प्रकारची प्रतिमा घरात मुख्य रूममध्ये म्हणजे हॉलमध्ये ठेवावी.
11. पैशांची नाणी व पंखा ह्या बरोबर असणारे लाफिंग बुद्धा:
अश्या प्रकारची प्रतिमा घरात ठेवल्याने घरातील क्लेश नाहीसे होतात आर्थिक प्रगती होते. व सुख संपती व आरोग्य राहते.
12. दीर्घायु व आरोग्य ह्यासाठी हातात वु-लू घेतलेले लाफिंग बुद्धा ठेवावे.