एलोवेरा म्हणजेच मराठीत त्याला अस्सल कोरफड असे म्हणतात. एलोवेरा ही झाड खूप औषधी आहे. ते दिसायला अगदी सामान्य दिसते पण त्याचे फायदे कमालीचे आहेत पण त्याचा बरोबर त्याचे अति सेवन किंवा अति वापर केला तर त्याचे तेव्हडेच तोटे सुद्धा आहेत.
The Marathi language video Aloe Vera Side effects in Marathi can of be seen on our YouTube Channel of Side effects of Aloe Vera (Korfad)
एलोवेरा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच त्वचा व केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा फायदेमंद आहे. एलोवेरा म्हणजे आपल्याला निसर्गाने दिलेली एक देणगीच आहे. एलोवेरा च्या औषधी गुणधर्मा मुळे त्याच्या मुळे बरेच रोग बरे होतात. आपल्या त्वचा रोगापासून ते केस, पचन शक्ति, ब्लड शुगर, डायबीटीस ह्या रोगापासून आपल्याला आराम मिळू शकतो. एलोवेरा पोटाचे विकार, सांधेदुखी, डोळ्याचे आजार व केसांच्या आरोग्यासाठी फायदेमंद आहे.
एलोवेरा चे सेवन बऱ्याच प्रकारे करू शकता. त्याच्या जेलच्या डायरेक्ट उपयोग करू शकता किंवा त्याचे जूस बनवून सुद्धा उपयोग केला जातो. एलोवेरा चे खूप फायदे आहेत तसेच तुम्हाला माहीत आहे का त्याचे बरेच तोटे किंवा नुकसान सुद्धा आहे. कारण की त्याचे अति प्रमाणात सेवन करणे सुद्धा धोका दायक आहे.
आपण आज पहाणार आहोत एलोवेरा तोटे किंवा साईड इफेक्ट काय आहेत.
पोट दुखीचा त्रास होऊ शकतो:
एलोवेराच्या पानाच्यामध्ये लेटेक्स हा द्रव पदार्थ असतो तो पदार्थ स्कीनला वरतून लावल्यास चांगला आहे पण त्याचे सेवन केल्यास पोटाचे विकार होऊ शकतात काही लोकानाची एलर्जी सुद्धा असू शकते त्यामुळे पोटात दुखणे हा त्रास होऊ शकतो.
त्वचा स्कीन एलर्जी:
खूप वेळा असे होते की एलोवेरा जेलचा जास्त उपयोग म्हणजे त्वचेवर लाल चटे येणे किंवा खाज येणे. खर म्हणजे एलोवेरा स्कीन साठी फायदेमंद आहे पण त्याचा अति वापर केल्यास त्याचा आपल्या स्कीनवर दुष्परिणाम होऊ शकतो.
डीहाइड्रेशन:
खूप लोक आपले वजन कमी करण्यासाठी एलोवेरा जेलचे सेवन नियमित करतात त्याने वजन कमी सुद्धा होते पण त्याचा अतिरेक केला तर त्याचा दुष्परिणाम म्हणजे शरीरातील पाणी कमी होऊ शकते.
गर्भवती महिलाना एलोवेरा चे सेवन नुकसानदायक:
एलोवेरा मध्ये लैक्टेटिंग प्रॉपर्टी आहे त्यामुळे गर्भवती महिलाना ते हानिकारक होऊ शकते. एलोवेरा च्या सेवनाने गर्भशाय आकुंचन होऊ शकते.
ब्लड प्रेशर लेवल:
एलोवेरा चे नियमित सेवन ब्लड प्रेशर लो करू शकतो. एलोवेरा ही हाय ब्लड प्रेशरच्या लोकांसाठी फायदेमंद आहे पण लो ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांसाठी घातक ठरू शकते.
अशक्तपणा:
एलोवेराचे सेवन करताना ते नेहमी प्रमाण बद्ध केले पाहिजे म्हणजे नियमित सेवनाने शरीरातील पोटेशियम लेवल कमी होऊ शकते. व हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात त्यामुळे अशक्तपणा सुद्धा येवू शकतो.