दही हा पदार्थ सर्वाना आवडतो. त्याचा उपयोग जास्ती करून रायता म्हणजेच कोशिंबीर बनवण्यासाठी करण्यात येतो. दह्याचे सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत.
आपण जेवणात रोज दह्याचे सेवन केले तर त्याचे आपल्या शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदे होतात. रोज दह्याचे सेवन केले तर पोटाच्या तक्रारी दूर होऊन पचन क्रिया चांगली सुधारते. दही आपले शरीर ताजे तवाने ठेवण्यास मदत करते. ज्याना हृदय रोगाचा त्रास आहे त्यांना डॉक्टर दही सेवन करण्याचा सल्ला देतात. कारण की अश्या लोकाना दह्याचे सेवन फायदेशीर आहे.
The Marathi language video Health benefits of eating curd for hair, heart, skin bones and tensions of be seen on our YouTube Channel of Health benefits of eating Curd or Dahi
दहीमध्ये कॅल्शियम, प्रोटिन, विटामीन, बी 6 व विटामीन बी 12 व त्याच बरोबर अजून काही पोषक् तत्व आहेत. दही आपले केस, ब्लड प्रेशर, ऑसटीयोपोरोसिस व हाडांसाठी फायदेमंद आहे. दही कोलेस्ट्रॉल व शरीराचे वजन कमी करण्यास मदत करते. तसेच दही त्वचा रोग सुद्धा बरा करू शकतो.
1) पचन शक्ति सुधारते
दह्याचे नियमित सेवन करणे ही अमृत समान मानले जाते. आपली पचनशक्ति बरोबर नसेल तर आपल्याला बऱ्याच रोगाना सामोरे जावे लागते. दही शरीरातील रक्ताचे प्रमाण योग्य ठेवून व अशक्तपणा दूर करते व पोटातील इन्फेक्शन दूर करते. ज्याना भूक कमी लागते त्यांनी दही जरूर खावे.
2) रोग प्रतिकार शक्ति वाढते
दह्याचे सेवन केल्याने आपली रोग प्रतिकार शक्ति वाढते.
3) तोंडातील छाले म्हणजे तोंडातिल फोड बरे होतात
दहयाच्या वरील मलई दिवसातून 2-3 वेळा तोंडात ज्या ठिकाणी फोड आले आहेत त्यावर लावावी किंवा मध व दही समप्रमाणात घेऊन त्याचे सेवन करावे त्यामुळे सुद्धा आराम मिळतो. जर आपणा कडे मध नसेल तर फक्त दही सेवन करावे.
4) आपली हाडे बळकट बनवते
दहयामध्ये कॅल्शियम आहे. त्यामुळे दहयाच्या सेवनाने आपली हाडे मजबूत बनन्यास मदत होते. दह्याचे सेवन केल्याने अर्थराइटिसच्या रोग होण्या पासून बचाव होऊ शकतो.
5) त्वचेसाठी फायदेमंद
त्वचेसाठी दही फायदेमंद आहे. दही त्वचेला मॉइस्चराइज करते. ड्राय त्वचा असेल तर ती सुधारायला मदत करते. तोंडावर मुरूम पुटकुल्या असतील तर त्यावर दही रामबाण उपाय आहे. आपण दही व मध सम प्रमाणात घेऊन त्याचा पॅक बनवून लावू शकतो.
6) मानसिक तनाव कमी करते व एनर्जी वाढवते
हेल्थ एक्स्पर्ट ह्याच्या म्हणण्या नुसार दही चे सेवन केले तर मानसिक तनाव कमी होतो. दही खाण्याचा संबंध डायरेक्ट आपल्या मेंदू बरोबर आहे. एनर्जी साठी दही उपयोगी आहे. शारीरिक थकान, कमजोरी व एनर्जीसाठी दही फायदेमंद आहे.
7) केसांसाठी दही फायदेमंद
दहीचे सेवन करणे केसांच्या आरोग्यासाठी हितावह आहे. दहयामध्ये जी तवत आहेत ती केसांच्या आरोग्यासाठी फायदेमंद आहे. जर आपले केस कोरडे व निस्तेज असतील तर दही सेवन करावे कारण की त्यामध्ये लैक्टिक एसिड आहे ते उपयोगी आहे. तसेच मिनरल सुद्धा मिळते.
8) हृदय रोगावर फायदेमंद
रोजच्या जेवणात दही सेवन केले तर आपले हृदय आरोग्य चांगले राहते. कोलेस्ट्रॉल कमी करते ब्लड प्रेशर योग्य राहते रोज दही सेवन केल्याने हृदय रोग, हाय ब्लड प्रेशरचे रोग होत नाहीत.
डिस्क्लेमर:
ही माहिती फक्त सामान्य जाणकारी देण्यासाठी दिली आहे. जर आपल्याला कोणतासुद्धा रोग असेल तर कोणतेसुद्धा पदार्थ सेवन करण्याच्या अगोदर डॉक्टरचा सल्ला घ्यावा.