आपण स्वयंपाक बनवताना डाळ किंवा भाजीला चव व स्वाद येण्यासाठी फोडणी देतो. पण फोडणी देण्याने पदार्थाचा फक्त स्वाद वाढत नाही तर त्याचा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप फायदा होतो. तुम्हाला असे वाटले की ते कसे काय. आपण फोडणी देतो फोडणी देताना आपण ती खमंग व्हावी म्हणून काही पदार्थ वापरतो व त्याचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने बरेच फायदे आहेत. जर आपल्याला काही आजार असतील तर अनाहूतपणे त्या फोडणीच्या पदार्थ मुळे आपल्या रोगावर त्याचा चांगला परिणाम होऊन रोग बरा होण्यास मदत होते.
The Marathi language video Health benefits of Tadka in Indian cooking can of be seen on our YouTube Channel of Health benefits of Tempering in our food
आपण पाहूया की फोडणी दिल्यामुळे आपल्या शरीराला काय लाभ मिळतात. तसेच फोडणी कोणत्या पदार्थाला कश्या प्रकारे द्यायची व त्याचे काय फायदे आहेत.
पदार्थाला फोडणी दिल्यामुळे होणारे फायदे
हळद:
आपण बऱ्याच पदार्थाना फोडणी देताना हळद वापरतो. हळदीमध्ये असणारे एंटी ऑक्सिडेन्ट आपल्याला इंफेक्शन पासून बचाव करते. तसेच हळदी मध्ये असणारे एंटीबायोटिक तत्व आपली रोग प्रतिकार शक्ति वाढवून आपल्याला हणाऱ्या बऱ्याच रोगापासून दूर राहायला मदत करते.
कडीपता:
आपण फोडणीमद्धे कडीपत्ता वापरतो त्यामुळे पदार्थ स्वादिष्ट बनतो. कडीपत्तामध्ये विटामीन बी1, बी3, बी9, आयर्न, फॉस्फरस व कॅल्शियम आहे. कडीपत्ता मधील ही गुण आपली पचनशक्ति चांगली ठेवण्यास मदत करते तसेच आपल्या हार्ट म्हणजेच हृदय तक्रारी पण दूर करते डायडिटीज व आपले केस छान काळे ठेवण्यास त्याचा चांगला उपयोग होतो.
लसूण:
लसूणची खमंग फोडणी आपली रोग प्रतिकार शक्ति वाढवते. त्यामुळे इन्फेक्शन व सर्दी ताप ह्या रोगापासून पासून दूर राहतो.
मोहरी-जिरे:
फोडणी मधील मोहरी जिरे आपली पचन शक्ति सुधारून त्याच्या आजारांपासून आपला बचाव होतो. जिरामध्ये आयर्न, कॅल्शियम, पोट्याशीयम, व कॉपर अशी तत्व आहेत. मोहरी जिरे ह्याची फोडणी दिली तर पदार्थ स्वादिष्ट लागतो.
हिंग:
फोडणीमध्ये हिंग वापरले तर आपल्या पदार्थाला छान सुगंध येतो. हिंग वापरल्या मुळे पोटात गॅस होत नाही. स्वशन संबंधित विकारा पासून आराम मिळतो. पुरुषान मध्ये ताकत मिळते व पोटदुखी पासून आराम मिळतो.
मेथ्या दाणे:
मेथ्या दाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. ज्याना कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज आहे त्यांच्या साठी वरदान आहे. तसेच आर्थरायटीस आणि साईटिका ह्यासाठी रामबाण उपाय आहे. केसाचे आरोग्य चांगले राहते व पोटाचे विकार कमी होतात.
कोणत्या पदार्थाला कोणती फोडणी द्यायची
कढी:
दह्या पासून बनवलेली कढी बऱ्याच लोकाना आवडते. पण ती पोटात गेलीकी पचायला बऱ्याच वेळ लागतो. म्हणून कढीमध्ये फोडणी देताना मोहरी-जिरे व कडीपत्ता बरोबर मेथ्याचे दाणे घातले तर कधी अजून छान लागते व मेथ्या मुळे ती पचायला हलकी होते.
तुरीची डाळ:
आपण तुरीच्या डाळीची आमटी बनवतो तो थोडी गरम असते त्यामुळे त्याला तुपाची फोडणी करताना आले-लसूण व जिरे घाला.
सारसो का साग:
सारसो का साग ही पंजाबी लोकांची आवडती डिश आहे. ही डिश खूप स्वादिष्ट लागते. पण ह्या भाजी च्या सेवनाने बऱ्याच वेळा पोटात गॅस होतो. पोटात गॅस होऊ नये म्हणून फोडणीमध्ये कांदा, आले-लसूण घाला.
अरबी, भेंडी, भोपळा:
अरबी, भेंडी, भोपळा ह्या भाज्यांचे सेवन केले की ह्या भाज्या पोटात गेल्यावर पचण्यास थोडा वेळ लागतो त्यासाठी फोडणीमध्ये मेथी दाणे, बडीशेप व ओवा घातला तर त्या भाज्या लवकर पचन होते.
तुरीच्या डाळीचे वरण:
तुरीच्या डाळीचे वरण बनवताना नेहमी साजूक तुपात जिरे, हिंग व हळद घालावी त्यामुळे वरण छान खमंग होते व पचन होण्याच त्रास होत नाही.
लाल भोपळा:
लाल भोपळा पचायला थोडा जड आहे म्हणून फोडणी बनवताना तेलामध्ये मोहरे-जिरे, हिंग व मेथ्या घालाव्या त्यामुळे भाजीची टेस्ट खूप छान येते. तसेच सांबर बनवताना त्यामध्ये मेथ्या घालाव्या.
मुगाच्या डाळीची खिचडी:
मुगाच्या डाळीची खिचडी वाढताना त्याला वरतून तुपाची फोडणी द्यावी तेव्हा फोडणीमध्ये लसूण ठेचून घालावा खिचडी खूप मस्त लागते.