मसाले भात हा महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. सणवार, लग्न समारंभ, पार्टी असली की मसाले भात पाहिजेच. आपण घरी पूजा असली की देवाला नेवेद्य दाखवतो. तेव्हा नेवेद्य बनवताना कांदा-आल-लसूण वापरत नाही. अश्या वेळी बिना कांदा-आल-लसूण मसाले भात बनवावा लागतो.
कांदा-आल-लसूण न वापरता सुद्धा मसाले भात खूप टेस्टी लागतो. व त्यामध्ये सीझन प्रमाणे भाज्या वापरल्या की अजून छान निराळी टेस्ट लागते. घरी पाहुणे येणार असतील तर झटपट अश्या प्रकारचा मसाले भात बनवून त्या बरोबर एखादा तळणीचा पदार्थ सर्व्ह केला तरी चालतो.
The Marathi language video Maharashtrian Masale Bhat without Onion-Ginger-Garlic be seen on our YouTube Channel of Traditional Masale Bhat for Puja Bhog
बनवण्यासाठी वेळ: 25 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहीत्य:
1 कप बासमती तांदूळ
2 टे स्पून हिरवे ताजे मटार
1 छोटे गाजर (चिरून)
1 ½ टी स्पून गोंडा मसाला
1 टी स्पून साखर
1 टी स्पून गूळ
मीठ चवीने
मसाला करिता:
½ कप कोथबिर (धुवून चिरून)
2 टी स्पून धने
2 टी स्पून जिरे
7-8 मिरे
2-3 लाल सुक्या मिरच्या
टेस्टि वेज कोफ्ता पुलाव
फोडणी करिता:
1 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
6-7 काजू
2 टे स्पून किसमिस
¼ टी स्पून हळद
कृती: प्रथम तांदूळ धुवून अर्धा तास बाजूला ठेवा. कोथबिर, धने-जिरे, लाल मिरच्या 2 मिरे बारीक वाटून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, काजू, किसमिस, हळद घालून मोहरी तडतडली की तांदूळ घालून हिरवे मटार, चिरलेले गाजर घालून 2-3 मिनिट परतून घ्या.
तांदूळ परतून झाल्यावर त्यामध्ये 2 कप गरम पाणी घालून मिक्स करून झाकण ठेवून 7-8 मिनिट मंद विस्तवावर भात शिजवून घ्या. मग झाकण काढून त्यामध्ये वाटलेला मसाला, गोंडा मसाला, मीठ, साखर व गूळ घालून मिक्स करून परत झाकण ठेवून 5 मिनिट मंद विस्तवावर शिजवून घ्या.
गरम गरम मसाले भात सर्व्ह करा, मसाले भात सर्व्ह केल्यावर कोथबिर व साजूक तूप घाला.