केस गळणे, कान, हृदय, पोटाचे विकार, डायबीटीज, लिव्हर, त्वचा व अर्थराइटिस ह्यावर गुणकारी
मेथीची भाजी किंवा मेथीचे दाणे आपल्या सर्वांची परिचयाची आहे. आपण मेथीची भाजी बनवतो तसेच मेथ्या आपण भाजी किंवा आमटी बनवताना फोडणी देण्यासाठी वापरतो त्यामुळे आपल्या भाजी किंवा आमटिला छान सुगंध येतो व टेस्ट सुद्धा मस्त लागते.
मेथीचे दाणे ही साबण बनवण्यासाठी किंवा सौन्दर्य प्रसाधने बनवण्यासाठी वापरतात. त्याच्या व्यतिरिक्त त्याचे अजून गुणधर्म आहेत. मेथीचा उपयोग औषध बनवण्यासाठी सुद्धा होतो.
The Marathi language video Health Benefits of Methi Seeds be seen on our YouTube Channel of Methi Seeds Fenugreek Seeds Health Benefits for Hair, Heart, Skin, Liver, Ear reduce cholesterol and lowering blood sugar levels
आयुर्वेदमध्ये सांगितले आहेकी मेथीही अनेक रोगांवर औषधी सारखी उपयोगी आहे. मेथीच्या दाण्याचा उपयोग मसाला बनवण्यासाठी सुद्धा करतात. खेडे गावात बाळंतिनिला मेथीचे लाडू सेवन करण्यासाठी देतात. मेथी व मेथीचे तेल ह्यामध्ये डायबीटीज नियंत्रणात करण्याचे गुण आहेत.
मेथी ही कडवट असलीतरी तिचे गुणधर्म बरेच आहेत. मेथी चवीला कडवट असते त्यामुळे बरेच लोक मेथीची भाजी खात नाहीत. मेथी मध्ये रक्त शुद्ध करण्याचे गुणधर्म आहेत. मेथी थंडीच्या सीझनमध्ये खाणे खूप फायदेशीर आहे. बरेच लोक थंडी मध्ये मेथीचे लाडू बनवून सेवन करतात तर मग प्रतेक थंडी मध्ये मेथीचे लाडू खावे लागतात. त्यामुळे वायुचा त्रास होत नाही.
मेथीचे गुणधर्म:
केस गळण्याचे थांबण्याचे गुणधर्म मेथीमद्धे आहेत.
मेथीचे दाणे आपले केस गळण्याचे थांबवते. रात्री पाण्यात 1-2 चमचे मेथीचे दाणे भिजत ठेवा मग सकाळी ते वाटून केसांच्या मुळाशी लावून एक तास तसेच ठेवा. मग एक तासानी केस स्वच्छ धुवा. असे आठोडयातून 2-3 वेळा करा. केस गळणे थांबेल.
कान फुटून पाणी येत असेलतर त्यावर मेथी फायदेमंद आहे.
मेथीचे दाणे दुधामद्धे वाटून मग गाळून थोडेसे कोमट गरम करून 1-2 थेंब कानात घालावे त्यामुळे कानातून पाणी येणे बंद होते.
हृदय रोगावर मेथीचे दाणे सेवन करणे फायदेमंद आहे.
मेथीमध्ये एंटीआक्सीडेंटचे गुणधर्म आहेत त्यामुळे हृदय रोगासाठी फायदेमंद आहे. त्यामुळे रक्त पातळ होते व त्यामध्ये फायबर आहे जे हृदय रोगावर फायदेशीर आहे. हृदय स्वस्थ ठेवते. मेथीचा काढा बनवून त्यामध्ये मध् मिक्स करून त्याचे सेवन करावे.
मेथीचे दाणे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते. रोज मेथीची पावडर सेवन केल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होते.
पोटाचे आरोग्य चांगले राहते
मेथीचे दाणे खूप फायदेशीर आहेत. मेथी, चांदरसुर,कलौजी व ओवा रोज सेवन केल्याने गॅस, अपचन, पोटदुखी, पोट फुगणे, कमर दुखणे ह्या रोगावर फायदेमंद आहे.
जर कॉनस्टीपेशन त्रास असेल तर मेथीच्या सेवनाने कमी होतो. मेथीची भाजी सेवन करावी.
उलटीचा त्रास होत असेल तर कमी होतो.
सारखा उलटी होण्याचा त्रास होत असेलतर मेथीचे दाणे वाटून त्याचे चूर्ण बनवून सेवन करावे त्यामुळे उलटी होणे बंद होईल पण ही करण्या अगोदर डॉक्टर सल्ला घ्यावा.
डायबीटीस असेल तर ब्लड शुगर नियंत्रणात राहते.
मेथीच्या दाण्याची पावडर बनवून रोज सकाळी उपाशी पोटी एक चमचा पाण्यात घालून घ्यावी त्यामुळे ब्लड मधील साखर नियंत्रणात राहते. नाहीतर रात्री एक चमचा मेथी दाणे पाण्यात भिजवून सकाळी टे दाणे चाउन खावे त्यावर मेथीचे पाणी प्यावे.
लिव्हर चे आरोग्य चांगले राहते.
मेथीमद्धे एंटीआक्सीडेंट व हिपेटो-प्रोटेक्टिव ही गुण आहेत ते लिव्हर साठी उपयोगी आहेत.
स्कीनच्या रोगावर गुणकारी मेथी
मेथीचा लेप त्वचा रोग म्हणजे दाद खाज खुजली ह्या भागावर लावावा त्याने चांगला फायदा होतो.
अर्थराइटिस साठी मेथी गुणकारी आहे.
अर्थराइटिस असणाऱ्यानी मेथीचे सेवन जरूर करावे.