आपण आपल्या चेहऱ्याची किंवा स्कीनची काळजी घेतो पण आपल्या पायाच्या टाचा ह्याकडे आपण लक्ष देत नाही. पण ते सर्वात महत्वाचे आहे. कारण की आपल्या पायांचे सौन्दर्य टाचांवर सुद्धा अवलंबून आहे. आपण सूट घालतो तेव्हा उंच टाचेच्या चप्पल किंवा सँडल्स घालतो तेव्हा जर आपल्या टाचा भेगा पडलेल्या दिसल्या तर आपल्यालाच बरे वाटत नाही त्यामुळे आपल्या टाचांकडे सुद्धा आपल्याला लक्ष दिले पाहिजे. थंडीच्या सीझनमध्ये भेगा पडलेल्या टाचांचा जास्त त्रास होतो किंवा ज्या महिला पाण्यात काम करतात त्याना टाचांचा जास्त त्रास होतो.
The Marathi language video Home Remedies to cure cracked heels in Marathi can of be seen on our YouTube Channel of Cracked Heels Remedy
आपल्या टाचांचे आरोग्य चांगले नसेल तर आपल्याला भेगा पडलेल्या भागातून इन्फेक्शन होऊन त्या दुखू शकतात, तसेच त्यामुळे आपल्याला चालायला त्रास होऊ शकतो.
आपण आपल्या टांचासाठी त्रस्त आहात तर ह्या काही घरगुती प्रभवी टिप्स आहेत त्याच्या उपायांनी आपल्या टाचा छान मुलायम होतील.
The text Easy Home Remedies to Cure Cracked Heels in Marathi Language can be seen her:
मध व पिकलेले केळे:
पायाच्या भेगा पडलेल्या टाचांना लवकर बरे करण्यासाठी मध व पिकलेले केळे ह्याच पॅक बनवून लावावा. पॅक बनवण्यासाठी 1 पिकलेले केळे (कुस्करून) व 2 टी स्पून मध मिक्स करून त्यामध्ये एवोकाडो पण मिक्स करू शकता. हा पॅक थोडा घट्ट सर करून मग आपल्या पायाच्या टाचावर लावू शकता. पॅक लावल्यावर 30 मिनिट तसेच ठेवावे. हा पॅक नैसर्गिक मॉइस्चराइजर करण्याच्या रुपाचे काम करून टाचा ठीक करते.
मध व केळ्याचा पॅक कसे काम करतो
मध्यामद्धे एंटी-बैक्टीरियल गुण आहेत. जे आपल्या स्कीनला मॉइश्चराइज व हाइड्रेट ठेवतो. त्याच बरोबर केळे सुद्धा आपल्या स्कीनला मॉइश्चराइज करण्याचे काम करते. तो आपला चेहरा ते पायाच्या टाचांच्या भेगा पर्यन्त ठीक ठेवण्यास मदत करतो. अश्या प्रकारचा पॅक टाचांना पडलेल्या भेगा भरून आपल्या टाचा मुलायम ठेवण्याचे काम करतो.
आपल्या टाचांना पडलेल्या भेगा बरे करण्याचे अजून काही उपाय आहेत.
प्यूमिक स्टोनचा उपयोग
प्यूमिक स्टोन हा एक असा दगड आहे की तो आपली त्वचा साफ करण्यासाठी मदत करतो. ह्या दगडाचा उपयोग करून आपली जाड व खरखरीत त्वचा आपण साफ करू शकतो. तसेच हा दगड स्क्रबिंग, भेगा पडणे व काही स्कीनचे आजार बरे करण्यास उपयोगी आहे. हा दगड डेड स्कीन काढून भेगा पडलेल्या भरून काढण्यास मदत करतो. एका बादलीमध्ये किंवा टबमध्ये पाणी घेऊन आपले पाय पाण्यात सोडावे मग त्यामध्ये थोडासा शैंपू घालून त्याचा झाक बनवा मग थोडा वेळ आपले पाय पाण्यात ठेवा. नंतर प्यूमिक स्टोन घेऊन आपल्या टाचा घासून घ्या. मग एक चमचा मीठ व 1 चमचा ऑलिव्ह ऑइल मिक्स करून पायाला थोडे घासून घ्या. असे दर 2-3 दिवसांनी एकदा करा लवकरच त्याचे चांगले परिणाम आपल्याला दिसून येतील.
रात्री झोपण्याच्या अगोदर पायाला तेल लाऊन मालीश करा.
रात्री झोपायला जाण्याच्या अगोदर पाय स्वच्छ धुवून त्याला ऑलिव्ह ऑइल, एरंडेल तेल व बदाम ऑइलने मालीश करून जुने मोजे घालून मग झोपावे असे थोडे दिवस रोज करावे लवकरच फायदा होईल.
गुलाबाच्या पाकळ्या व दूधचा उपयोग करावा
पायाच्या भेगा बऱ्या करण्यासाठी एका टबमध्ये आपल्या टाचा बुडतील एव्हडे गरम पाणी घ्यावे मग त्यापाण्यात 1/2 कप दूध व गुलाबाच्या पाकळ्या, कडीलिंबाची पाने व 4-5 थेंब कोणतेपण सुवासिक तेल घालून 30 मिनिट पाय तसेच पाण्यात ठेवावे. मग हलक्या हातांनी रगडून काढावे. असे केल्याने भेगा पडलेल्या भरून येतील व डेड स्कीन चांगली होईल.