आपण उकडलेल्या बटाट्याची भाजी नेहमी कांदा-आले-लसूण घालून बनवतो. पण आपण जेव्हा सणवाराला किंवा लग्न समारंभ किंवा पार्टीला सुद्धा बनवतो. पण जेव्हा आपल्याला देवाला नेवेद्य दाखवायचा असतो तेव्हा आपण शक्यतो कांदा-आले-लसूण वापरत नाही. कारण की आपण नॉनवेज बनवतो तेव्हा कांदा-आले-लसूण वापतो.
बटाट्याची अश्या प्रकारची भाजी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल. अश्या प्रकारची भाजी बनवायला सोपी व अगदी झटपट होणारी आहे. आपण पुरी बरोबर किंवा चपाती बरोबर सर्व्ह करू शकतो. बटाट्याची भाजी बनवताना फक्त फोडणी घालायची आहे कोणता सुद्धा मसाला वापरला नाही तरी खूप टेस्टी भाजी लागते.
The Marathi language video Potato Bhaji without Onion-Ginger-Garlic be seen on our YouTube Channel of Traditional Boiled Potato Bhaji Without Onion-Ginger-Garlic For Bhog
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 2 जणसाठी
साहीत्य:
3 मध्यम आकाराचे बटाटे (उकडून,सोलून,चिरून)
1 टी स्पून लिंबूरस
1 टी स्पून साखर
मीठ चवीने
2 टे स्पून कोथबिर (चिरून)
फोडणी करिता:
1 टे स्पून तेल
½ टी स्पून मोहरी
½ टी स्पून जिरे
1 चिमूट हिंग (पाहिजे तर)
2 हिरव्या मिरच्या (चिरून)
7-8 कडीपत्ता पाने
¼ टी स्पून हळद
सजावटीसाठी:
कोथबिर व ओला नारळ (खोवून)
कृती: प्रथम बटाटे उकडून, सोलून, चिरून घ्या. कोथबिर धुवून चिरून घ्या. हिरव्या मिरच्या चिरून घ्या.
एका बाउलमध्ये उकडलेले बटाटे, लिंबुरस, साखर, मीठ व कोथबिर घालून मिक्स करून ठेवा.
एका कढईमद्धे तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, हिरव्या मिरच्या, कडीपत्ता पाने घालून थोडेसे गरम करून त्यामध्ये हळद घालून मिक्स करून उकडलेले बटाटे घालून मिक्स करा. कढईवर 2 मिनिट झाकण ठेवून भाजीला चांगली वाफ येवू द्या. मग विस्तव बंद करून भाजी सरविंग बाउलमध्ये काढून वरतून कोथबिर व ओला नारळ घालून गरम गरम चपाती किंवा पुरी बरोबर सर्व्ह करा.