मसुर भजवून आपण त्याची उसळ किंवा आमटी बनवतो. ह्या अगोदरच्या विडियो मध्ये आपण मोड आलेल्या मसुरची कोंकणी पद्धतीने व सिकेपी पद्धतीने आमटी कश्या प्रकारे बनवायची ते पाहिले आता आपण कोल्हापुरी पद्धतीने आमटी कशी बनवायची ते पाहू या.
The Marathi language video Kolhapuri Style Tasty Khamang Akhya Masoor Chi Amti in Marathi can of be seen on our YouTube Channel of kolhapuri akkha masoor amti
कोल्हापुरी पद्धतीने अख्या मसुरची मोड न आणता आमटी कशी बनवायची ते पाहू या. अश्या प्रकारची आमटी बनवायला अगदी सोपी आहे व झटपट होणारी आहे. तसेच ती टेस्टी लागते.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
½ कप अखे मसूर
1 टी स्पून तीळ, 3 टे स्पून डेसिकेटेड कोकनट
1 टे स्पून तेल
1 मध्यम आकाराचा कांदा (चिरून)
1 टे स्पून आल-लसूण पेस्ट
¼ टी स्पून हळद, ¾ किंवा 1 टी स्पून गरम मसाला
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून धने-जिरे पावडर
1 टी स्पून मीठ किंवा चवीने
1 टे स्पून टोमॅटो (चिरून)
½ कप पाणी किंवा लागेल तेव्हडे
कोथिंबीर चिरून सजावटीसाठी
कृती: प्रथम मसूर धुवून 2 तासात पाण्यात भिजत ठेवा. कांदा, कोथिंबीर चिरून घ्या. आल-लसूण पेस्ट बनवून घ्या. टोमॅटो चिरून घ्या.
मग कुकरमद्धे मसूर ठेवून 3 शिट्या काढून घ्या.
एक कढई गरम करून त्यामध्ये तीळ थोडेसे गरम करून त्यामध्ये डेसिकेटेड कोकनट 2 मिनिट भाजून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये थोडेसे ग्राइंड करा.
कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, आल-लसूण 2-3 मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, चवीने मीठ घालून त्यामध्ये शिजवलेले मसूर घालून मिक्स करा. मग त्यामध्ये 1 कप पाणी घालून चांगली उकळी आणा.
आमटिला उकळी आलीकी वाटलेले डेसिकेटेड कोकनट घालून 5 मिनिट मंद विस्तवावर आमटी शिजवून घ्या. कोथिंबीर घालून आमटी बाउलमध्ये काढून घ्या.
गरम गरम मसुरची आमटी भाता बरोबर किंवा पराठा बरोबर सर्व्ह करा.