ब्रोकली ही भाजी बाजारात नेहमीच मिळेल असे नाही. ब्रोकली मध्ये खूप सारे गुण आहेत. त्यामध्ये प्रोटिन, कॅल्शियम, कार्बोहाइड्रेट, आयर्न, विटामीन ए, सी व अजून पोषक तत्व आहेत.
ब्रोकोली ही भाजी फ्लॉवरच्या भाजी सारखीच दिसते पण तिचा रंग गडद हिरवा असतो. ही भाजी जास्ती करून युरोप कंट्रीमध्ये वापरली जाते. iब्रोकली पासून आपण सॅलड, भाजी किंवा सूप बनवू शकतो. ही सर्व प्रकार खूप टेस्टी लागतात. तसेच पास्तामध्ये सुद्धा घालू शकतो. ब्रोकोलीचे सेवन महिलांसाठी खूप फायदेमंद आहे.
The Marathi language video Benefits of Broccoli in Marathi can of be seen on our YouTube Channel of Broccoli Health Benefits
ब्रोकोलीच्या सेवनाचे फायदे:
हृदय रोगासाठी गुणकारी
ब्रोकलीमध्ये कैरेटेनॉयड्स लयूटीन हे तत्व आहे त्याच्या मुळे हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिन्यानचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे हार्ट अटॅक किंवा अजून काही रोग होण्यापासून बचाव होतो. तसेच त्यामध्ये पोट्याशीयम आहे त्यामुळे कोलेस्ट्रॉलचा वाढत नाही.
कॅन्सर होण्यापासून बचाव
ब्रोकली च्या सेवनाने कॅन्सर होण्यापासून बचाव होतो. ब्रोकली मध्ये फिटाकेमिकल जास्त प्रमाणात आहे तसेच त्यामध्ये असणारे तत्व शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.
आपला मूड चांगला राहतो
ब्रोकली मध्ये फोलेटची मात्रा जास्त प्रमाणात आहे त्यामुळे डिप्रेशनचा खतरा होत नाही व आपला मूड सुद्धा चांगला राहतो. त्याच बरोबर आपले मानसिक स्वाथ चांगले राहते.
रोग प्रतिकार शक्ति वाढते
ब्रोकली मध्ये विटामीन सी भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे रोग प्रतिकार शक्ति वाढते.
गर्भावस्थामध्ये खूप फायदेशीर
गर्भवती महिलानी ब्रोकलीचे नियमित सेवन करावे. त्यामधील पोषक तत्व बाळाच्या विकासासाठी फायदेमंद आहे. तसेच आईला सुद्धा बऱ्याच रोगापासून दूर ठेवते.
वजन कमी करण्यास मदत
आपल्या शरीराचे वजन कमी किंवा जास्त होणे ही आपल्या खाण्या पिण्यावर अवलंबून आहे. जास्त तेलकट व बाहेरील खाणे ह्या मुळे वजन वाढते. त्यामुळे ब्रोकलीचे सेवन करणे फायदेशीर आहे. ब्रोकली मध्ये विटामीन सी व अॅंटी ऑक्सिडेन्ट आहे ते आपली चरबी कमी करते
लिवरच्या आरोग्यासाठी ब्रोकोली:
लिवरमध्ये फैटचे प्रमाण वाढले की समस्या वाढतात मग लिवर काम करणे बंद करते. ब्रोकलीमध्ये सल्फोराफेन आहे त्यामुळे लिवरचे आरोग्य चांगले राहते. पण लिवरचा कॅन्सर झाला असेल तर ह्याचा परिणाम होत नाही.
दात व हाड ह्याचे आरोग्य चांगले राहते
शरीरातील पोषक तत्व कमी झाली की दात व हाड कमजोर व्हायला लागतात. ब्रोकली मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे त्यामुळे त्याचे सेवन करावे.
ब्रोकली पासून आपल्या शरीराची पचन शक्ति वाढते, डायबीटीससाठी उपयोगी, स्कीनसाठी उपयोगी, केसांचे आरोग्य चांगले राहते. तसेच डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.
Plant eachin of Maharashtra in Solapur