गूळ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे त्याचे आपल्या आरोग्यासाठी बरेच फायदे आहेत. त्याच्या सेवनाने आपल्याला एनर्जी मिळते, साखरेच्या पेक्षा गुळाचा चहा सेवन करावा. त्यामुळे वजन कंट्रोलमध्ये राहून बऱ्याच आजारांपासून आपल्याला मुक्ती मिळते. त्यामुळे रोग प्रतिकार शक्ति सुद्धा वाढते.
The Marathi language video Jaggery Tea with advantages and disadvantages in Marathi can of be seen on our YouTube Channel of Benefits of Gaggery Tea
गुळाच्या चहाचे फायदे:
पोटावरील चरबी कमी होते
काही लोकाना गूळ खाणे आवडत नाही त्यांनी साखरेच्या आयवजी गुळाचा चहा सेवन करावा त्यामुळे साखर खाणे कमी होऊन पोटावरील चरबी कमी होते.
पचनक्रिया सुधारते
गुळाचा चहा सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते व छातीत जळजळ होत नाही. गुळामध्ये बरेच विटामीन व मिनरल आहेत. त्यामुळे पचन क्रिया सुधारते.
माइग्रेन असणाऱ्याना आराम
ज्याना माइग्रेनचा त्रास आहे त्याचे डोके खूप दुखते. त्यांनी गाईच्या दुधाचा गूळ घालून चहा सेवन करावा.
शरीरात रक्ताची कमी
शरीरात रक्त कमी असेल तर गूळ घालून चहा सेवन करावा. कारण गुळामध्ये आयर्न आहे तसेच आपल्या शरीरात सर्व ठिकाणी ऑक्सिजन पुरवण्याचे काम करते.
गुळाचे जास्त सेवन केलेतर त्याचे तोटे
गूळ हा उष्ण आहे त्यामुळे त्याचे सेवन प्रमाणात करावे. तसेच वजन सुद्धा वाढू शकते व नाकातून रक्त सुद्धा येऊ शकते व जास्त सेवन केल्याने पचनक्रिया सुद्धा बिघडू शकते.
गुळाचा चहा बनवण्याचा सटीक पद्धत त्यामुळे दूध फाटणार नाही व चहा अगदी मस्त फेसाळ युक्त बनेल.
गुळाचा चहा कसा बनवायचा
साहित्य: दोन कप चहासाठी
1 कप पाणी
1 कप दूध
1” आले तुकडा
1 ½ टे स्पून गूळ (चिरून) किंवा गुळाची पावडर
2 टे स्पून चहा पावडर
कृती: चहाच्या भांड्यात एक कप पाणी गरम करायला ठेवा मग त्यामध्ये आले (ठेचून) घाला, त्याच बरोबर गूळ व चहा पावडर घालून चांगली उकळी येऊ द्या मग त्यामध्ये एक कप गरम दूध घालून एक उकळी आली की विस्तव बंद करून चहा गाळून सर्व्ह करा.
अश्या पद्धतीने गुळाचा चहा बनवला तर काहीसुद्धा दूध नासणार नाही.