मेथीच्या सुक्या पानांना कसूरी मेथी म्हणतात. भारतात आमटी किंवा करी मध्ये मसालाच्या रूपात थोडशी कसूरी मेथी घातली की एकदम मस्त टेस्ट येते.
आपण घरी अगदी सोप्या पद्धतीने अगदी स्वस्त व मस्त कसूरी मेथी अगदी वर्षभर टिकेल अशी बनवू शकतो ते पण विदाउट ओव्हन किंवा माईक्रो वेव्ह अगदी झटपट 10 मिनिट बनवू शकतो.
The Marathi language video How to prepare Kasuri Methi at Home in Marathi can of be seen on our YouTube Channel of Simple Homemade Dried Methi in 10 minutes without Oven or Microwave
कसूरी मेथी बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. आता सीझनमध्ये आपल्याला 5 ते 10 रुपयांत एक गड्डी मिळते तीच गड्डी आपण कसूरी मेथी बनवून वर्षभर वापरू शकतो.
साहित्य:
1 कप मेथी – तुरे (स्वच्छ धुवून)
½ कप मीठ
कृती:
आपण मेथीची भाजी बाजारातून आणतो. मेथी दोन प्रकारे मिळते एक मेथी गोलाकार पानाची असते व दुसरी मेथी लांबट पानाची असते. साधरणपणे गोलाकार मेथीची भाजी कसूरी मेथी बनवण्यासाठी वापरतात कारण की ती कमी कडू असते. पण गोलाकार मेथची पाने असणारी मेथी क्वचितच मिळते. मग लांबट पानाची मेथी वापरावी.
मेथीच्या भाजीचे तुरे काढून घ्या. पिवळी पाने काढून टाका. मग एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये मेथीची पण 10 मिनिट भिजत ठेवा. म्हणजे पानावरील माती निघून जाईन. मग दुसऱ्या पाण्यात परत पाने स्वच्छ धुवून घ्या. पाणी काढून भाजी स्वच्छ कापडावर पसरवून ठेवा. म्हणजे भाजीचे पाणी निघून जाईन पाणी पूर्ण निघून गेले पाहिजे त्याकरिता 3-4 तास भाजी तशीच पसरून बाजूला ठेवा.
एका जाड बुडाच्या मध्यम आकाराची कढई गरम करायला ठेवा. मग त्यामध्ये ½ कप मीठ घालून पसरवून ठेवा. मीठ गरम झाले की त्यावर एक छोटा स्टँड ठेवा. एक साळणी घेऊन त्यावर मेथीची सुकलेले पाने पसरवून ठेवा. चाळणी कढई मधील स्टँडवर ठेवा. त्यावर एक झाकण ठेवा. मग मोठ्या विस्तवावर 2-3 मिनिट ठेवा. मग झाकण काढून मेथी वरखाली करून परत झाकण ठेवून विस्तव 5 मिनिट मध्यम ठेवा. मग झाकण काढून मेथीची पाने वर खाली करून परत 2-3 मिनिट झाकण ठेवा विस्तव मंद ठेवा. 2-3 मिनिट झाल्यावर विस्तव बंद करून झाकण काढून चाळणी थंड करायला ठेवा.
थंड झाल्यावर बरणीमद्धे किंवा डब्यात भरून ठेवा.