समर उन्हाळा चालू झालकी आपल्याला आपल्या स्कीन त्वचाच्या समस्याना सामोरे जावे लागते. आपल्याला कामानिमिताने घरा बाहेर पडावे लागते जर आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली नाही तर उन्हामुळे ती काळी पडते म्हणजेच टॅन होते. तर त्यासाठी घरगुती उपाय अगदी सरल सोपे अगदी कमी खर्चाचे आपण करू शकतो. आपण बाजारातून महागडी केमिकल युक्त क्रीम आणतो त्याचे आपल्या स्कीनवर दुष्परिणाम होतात. त्यापेक्षा आपण विना केमिकल घरगुती उपाय करू शकतो.
The Marathi language video Home Remedies how to remove tan in summer season in Marathi can of be seen on our YouTube Channel of Home remedies to remove tan skin in summer
1. लेमन टच:
टॅन झालेली त्वचा दूर करण्यासाठी आपण लिंबुरसचा वापर करू शकतो. लिंबूमध्ये विटामीन सी भरपूर प्रमाणात आहे ही आपल्याला माहीत आहेच. लिंबुरस चेहऱ्यावर लावल्याने नैसर्गिक रित्या आपल्या त्वचेला विटामीन सी मिळते. त्यामुळे स्कीन वरील काळे डाग व टॅन झालेली स्कीन नैसर्गिक रित्या ब्लीच होऊन आपली स्कीन उजळ होते. तसेच ऑईली स्कीन साठी लिंबू फायदेशीर आहे. आपल्या स्कीनवर लिंबूरस लावून 30 मिनिट नंतर स्वच्छ धुवावी.
2. दही:
दही ही आपल्या आरोग्यासाठी व सौदर्यसाठी खूप उपयोगी आहे. दही चांगले फेटून त्यामध्ये लिंबुरस मिक्स करून जेथे आपली स्कीन टॅन झाली आहे तेथे लावावे मग 30 मिनिट नंतर धुवावे. दही व लिंबू आपल्या स्कीनला नैसर्गिक क्लिन्झर चे काम करते. पण चेहरा स्वच्छ धुतल्यावर आपला चेहरा मॉईस्चराईज करायला विसरू नका,
3. टोमॅटोचा रस:
आपण रोजच्या जेवणात टोमॅटो वापरतो त्याच्या सेवनाने आपल्या शरीराला बरेच फायदे सुद्धा होतात तसेच त्याचा उपयोग स्कीनसाठी सुद्धा खूप होतो. समर सीझनमध्ये ह्याच सर्वात जास्त उपयोग होतो. स्कीनच्या सुरक्षेसाठी टोमॅटो उपयोगी आहे कारण की त्यामध्ये लाइकोपिन आहे व ते एंटी एजिंगची समस्या दूर करते तसेच टोमॅटोचा रस स्कीन वर लावल्याने सुरकुत्या कमी होतात व समर मध्ये स्कीनला निरोगी ठेवते. टोमॅटोच्या रसात लिंबुरस मिक्स करून लावावे 30 मिनिट नंतर धुवावे.
4. हळद:
हळद मध्ये लिंबुरस मिक्स करून लावावे मग थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ धुवावा असे एका आठोडयात तीन वेळा करावे. लगेच त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. हळदही बहुगुणी व व आरोग्यदाई आहे. तसेच ती सौदर्य वर्धक सुद्धा आहे. त्वचा चमकदार, नितळ व निरोगी ठेवण्याचे कम हळद करते. आपण बेसन व हळद मिक्स करून लावू शकतो किंवा हळद व लिंबुरस मिक्स करून सुद्धा आपण लावू शकतो. तसेच हळदमध्ये दूध किंवा मध घालून सुद्धा लावू शकतो. हळद व खोबरेल तेल मिक्स करून लावावे कारण खोबरेल तेलात अंटी फंगल गुणधर्म आहेत व ते मॉश्चराईजिंगचेही काम करते व त्वचेचा कोरडे पणा कमी होतो.
5. बटाटा:
बटाटा आपल्या स्कीनसाठी उपयोगी आहे. त्याच्या गुणधर्मा मुळे टॅन झालेली स्कीन चांगली करण्याचे काम करते. त्वचे वरील काळे डाग बटाटामुळे निघून जातात. त्यासाठी बटाटा किसून चेहऱ्यावर लावावा मग 30 मिनिट नंतर चेहरा धुवावा. त्यामुळे रंग उजळतो. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. बटाटा एंटी-एजिंग चे काम चांगले करतो. त्यामध्ये लिंबू रस मिक्स करून सुद्धा लावू शकतो. तसेच चेहऱ्यावरील डार्क स्पॉट डोळ्या खाली झालेले काळे डाग सुद्धा कमी होतात.