आपण कोथिंबीर वडी नेहमी बनवतो पण आता आपण जरा वेगळ्या प्रकारे कोथिंबीर वडी बनवणार आहोत. त्यामध्ये आपण काजू वापरले आहेत. कोंकणी पद्धतीने कोथिंबीर वडी म्हणजे त्यामध्ये काजू घातले तर एकदम मस्त लागते. कोकण ह्या भागात काजू मुबलक प्रमाणात मिळतात व कोकण ह्या भागात बऱ्याच रेसीपी मध्ये काजू वापरले जातात.
The Marathi language video Maharashtrian Style Kaju Kothimbir Vadi in Marathi can of be seen on our YouTube Channel of Tasty Kokani Style Cashew Nut Coriander Vadi
कोथिंबीर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. त्यामध्ये प्रोटिन, कार्बोहायड्रेट, फायबर व मिनरलस आहेत. तसेच त्यामध्ये कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम, विटामिन सी, फॉस्फरस आणि कॅरोटीन पण आहे.
कोथिंबीर आपल्या त्वचेसाठी, केसांसाठी, रक्ततातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. कोथिंबीरमध्ये अँंटीसेप्टिक आणि अँटीऑक्सीडंट गुण आहेत.
काजू कोथिंबीर वडी बनवताना प्रथम मिश्रण शीजवून मग वाफवून घेतले आहे मग शालो फ्राय केले आहे. त्यामुळे त्याची टेस्ट खूप छान लागते.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहीत्य:
1 कप बेसन
1 चमचा आल-लसूण-हिरवी मिरची
2- टे स्पून कोथिंबीर (धुवून चिरून)
1 टी स्पून लाल मिरची पावडर
¼ टी स्पून हळद
1 टे स्पून चिंच कोळ
15-20 काजू
मीठ चवीने
2 ½ टे स्पून तेल
तेल काजू कोथिंबीर वड्या शालो फ्राय करण्यासाठी
कृती: प्रथम कोथिंबीर धुवून चिरून घ्या. आल-लसूण-हिरवी मिरची कुटून घ्या. काजूचे तुकडे करून घ्या.
एका बाऊलमध्ये बेसन, आल-लसूण-हिरवी मिरची, कोथिंबीर, लाल मिरची पावडर, हळद, काजू, मीठ, चिंच कोळ व 1 ½ कप पाणी घालून मिश्रण चांगले मिक्स करून घ्या.
कढईमध्ये 2 ½ टे स्पून तेल गरम करून बनवलेले मिश्रण घालून मिक्स करून मध्यम विस्तवावर मिश्रण थोडे घट्ट होई पर्यन्त आटवून घ्या. मिश्रण थोडे घट्ट झालेकी विस्तव बंद करून मिश्रण थंड करायला ठेवा.
एक स्टीलच्या ट्रेला तेल लावून घ्या मग त्यामध्ये बनवलेले मिश्रण घालून एक सारखे थापुन घ्या.
एका मोठ्या आकाराच्या भांड्यात पाणी गरम करून त्यावर मिश्रण घातलेला ट्रे ठेवून त्यावर झाकण ठेवा. झाकण ठेवल्यावर 30 मिनिट मंद विस्तवावर वाफवून घ्या. 30 मिनिट झाल्यावर झाकण काढून वड्या थंड करून चौकोनी वड्या कापून घ्या.
नॉन स्टिक तवा गरम करून त्यावर तेल लावून कापलेल्या वड्या ठेवून बाजूनी तेल सोडून दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत वड्या शालो फ्राय करून घ्या.
गरम गरम काजू-कोथिंबीर वड्या टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.