लच्छा पराठा ही एक पंजाबी पदार्थाची डिश आहे. खर म्हणजे पराठा हा पंजाबमधील लोकप्रिय आहे पण आता प्रतेक प्रांतात बनवतात. आपण हॉटेलमध्ये कोणत्या पार्टीला गेलो तरी तेथे सुद्धा आपल्याला लच्छा पराठा पाहायला मिळतो. आता आपण घरी सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने लच्छा पराठा अगदी हॉटेल सारखा लेयर वाला बनवू शकतो.
The Marathi language video Wheat Flour Restaurant Style Lachha Paratha in Marathi can of be seen on our YouTube Channel of Simple Homemade Punjabi Layered Paratha
बऱ्याच ठिकाणी लच्छा पराठा मैदा वापरुन बनवतात पण आपण गव्हाचे पीठ वापरुन बनवणार आहोत. लच्छा पराठा बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा आहे. आपण कोणत्या सुद्धा रस्सा भाजी बरोबर किंवा नॉन व्हेज डिश बरोबर सर्व्ह करू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 6-7 पराठे बनतात
साहीत्य:
2 कप गव्हाचे पीठ
1 टे स्पून तूप
1 टी स्पून मीठ
¾ किंवा लागेल तेव्हडे कोमट पाणी
¼ कप साजूक तूप
कृती: एका बाउलमध्ये गव्हाचे, मीठ व तूप मिक्स करून घ्या. एक कप पाणी कोमट करून घ्या. मग कोमट केलेले पाणी हळू हळू गव्हाच्या पिठात घालून नेहमी प्रमाणे पीठ मळून घ्या. मग झाकण ठेवून 30 मिनिट बाजूला ठेवा. नंतर मळलेल्या पिठाचे एक सारखे 6-7 गोळे बनवा.
एक पिठाचा गोळा घेऊन लाटून घ्या. खूप जाड लाटायचा नाही. गोळा लाटून झाल्यावर त्यावर तूप लावून पसरवून घ्या. त्यावर पीठ भुरभुरा मग एका बाजूनी थोडेसे फोल्ड करा. फोल्ड करताना झिक झ्याक सारखे गोल्ड करा म्हणजे आपण लहान मुलासाठी पेपरचा जसा पंखा बनवतो अगदी तसा. पूर्ण फोल्ड झाल्यावर त्याची गोलाकार वळकुटी करायची म्हणजे भुई चक्रा सारखी. त्यानंतर त्यावर थोडे पीठ लावून लाटून घ्या. साधारणपणे पराठा 6” ते 8” गोल लाटावा.
नॉन स्टिक तवा गरम करून त्यावर लाटलेला पराठा टाकून दोन्ही बाजूनी छान भाजून घ्या. पराठा भाजून झाल्यावर गरम असतानाच बोटांनी त्याच्या बाजू थोड्या फोल्ड करा म्हणजे त्याचे लेयर मोकळे होतील. मग त्याला वरतून तूप किंवा बटर लावा. अश्या पद्धतीने सर्व पराठे बनवून घ्या.
गरम गरम पंजाबी स्टाईल लच्छा पराठा अंडा करी किंवा चिकन करी बरोबर सर्व्ह करा.