आपण ह्या अगोदरच्या विडियोमध्ये ब्रोकोलीच्या सेवनाचे फायदे पाहिले. ब्रोकोली ही भाजी इटालियन आहे. तेथे ह्या भाजीचा सर्वात जास्त वापर होतो. पण आता त्याची शेती हिमाचल, कश्मीर, उतरांचाल ह्या भागात होते. युरोप कंट्रीमध्ये ह्या भाजी पासून सूप, सॅलड बनवले जाते. ब्रोकोली आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप हितावह आहे त्याच्या सेवनांचे अनेक गुणधर्म आहेत.
ब्रोकली ही भाजी बाजारात नेहमीच मिळेल असे नाही. ब्रोकली मध्ये खूप सारे गुण आहेत. त्यामध्ये प्रोटिन, कॅल्शियम, कार्बोहाइड्रेट, आयर्न, विटामीन ए, सी व अजून पोषक तत्व आहेत.
The Marathi language video Simple Maharashtrian Style Broccoli chi Bhaji in Marathi can of be seen on our YouTube Channel of Broccoli Tasty Bhaji
बनवण्यासाठी वेळ: 15 मिनिट
वाढणी: 2 जणसाठी
साहीत्य:
1 कप ब्रोकोली (चिरून)
1 मध्यम आकाराचा कांदा (चिरून)
2 छोट्या हिरव्या मिरच्या किंवा लाल मिरच्या
¼ टी स्पून आले (किसून)
मीठ चवीने
कोथिंबीर सजावटीसाठी
फोडणी करीता:
½ टे स्पून तेल
½ टी स्पून मोहरी
½ टी स्पून जिरे
¼ टी स्पून हळद
कृती: प्रथम ब्रोकोली धुवून चिरून घ्या. पण चिरताना बारीक चिरायची नाही त्याचे छोटे तुरे कापून घ्यायचे. कांदा चिरून घ्या. मिरची व कोथिंबीर चिरून घ्या. आले किसून किवा ठेचून घ्या.
एका कढईमद्धे तेल गरम करून त्यामध्ये मोहरी जिरे घालून चिरलेला कांदा व मिरची घालून थोडे परतून घ्या. मग त्यामध्ये हळद, चवीने मीठ घालून चिरलेली ब्रोकोली घालून मिक्स करून कढई वर झाकण ठेवा. झाकणावर पाणी घालून 8-10 मिनिट मंद विस्तवावर भाजी शिजवून घ्या. मधून मधून झाकण काढून भाजी हलवून घ्या. कोथिंबीर घालून भाजी चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करा.