पालक आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. पालक मध्ये विटामिन ए, विटामिन सी, विटामिन के, मैग्नीशियम, मैगनीज व आयर्न आहे.पालकच्या सेवनाने डोळ्याचे आरोग्य चांगले राहते तसेच ब्लड प्रेशर योग्य राहते.
पालकची भाजी, भजी किंवा पालक पनीर आपण बनवतो. पालक वडी सुद्धा मस्त लागते पालक वडी बनवायला सोपी आहे तसेच झटपट होणारी आहे. आपण पालक वडी जेवणात किंवा साईड डिश म्हणून सुद्धा बनवू शकतो.
The Marathi language video Maharashtrian Palak Vadi in Marathi can of be seen on our YouTube Channel of Kokani Style Spinach Wadi or Palak Vadi
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 2 जणसाठी
साहीत्य:
1 कप पालक पाने (चिरून)
1 टे स्पून आल-लसूण-हिरवी मिरची पेस्ट
¼ टी स्पून ओवा
¼ टी स्पून हळद
½ टि स्पून लाल मिरची पावडर
मीठ चवीने
2 टे स्पून बेसन
1 टे स्पून तांदळाचे पीठ
तेल शालो फ्राय करण्यासाठी
1 चमचा तीळ
कृती: प्रथम पालकची पान स्वच्छ धुवून चिरून घ्या. आल-लसूण-हिरवी मिरची पेस्ट करून घ्या.
एका बाउलमध्ये चिरलेला पालक, आल-लसूण-हिरवी मिरची, ओवा, लाल मिरची पावडर, हळद, मीठ बेसन, तांदळाचे पीठ घालून मिक्स करून त्याचा एक चपटा गोळा बनवून घ्या. एका स्टीलच्या प्लेटला तेल लावून त्यावर बनवलेला गोळा थोडा जाडसर थापुन घ्या.
एका भांड्यात पाणी गरम करून त्यावर एक स्टँड ठेवा व त्यावर पालकची प्लेट ठेवा, भांड्यावर झाकण ठेवून 12-15 मिनिट मंद विस्तवावर वाफवून घ्या. थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापून घ्या.
एका लोखंडी तव्याला किंवा नॉन स्टिक तवा तेल लावून त्यावर तीळ घालून कापलेल्या वड्या ठेवा बाजूनी थोडे तेल सोडून छान कुरकुरीत वड्या फ्राय करून घ्या.
गरम गरम पालक वड्या सर्व्ह करा.