चिकन म्हंटले की आपल्या डोळ्याच्या समोर झणझणीत चिकन रस्सा येतो. अगदी चमचमीत तेलाचा तवंग आलेला. मग आपण कधी ते फस्त करतो असे होते. अश्या प्रकारचा चिकन रस्सा हॉटेलमध्ये किंवा धाब्यावर बनवतात.
The Marathi language video Mughlai Chicken Rassa in Marathi can of be seen on our YouTube Channel of Simple Mughali Chicken Gravy Restaurant Style
चिकन रस्सा आपण वेगवेगळ्या प्रकारे बनवतो. आता आपण जो चिकन रस्सा पहाणार आहोत तो सुद्धा अगदी वेगळ्या प्रकारे बनवला आहे. मस्त टेस्टी लागतो आपण जिरा राईस बरोबर किंवा चपाती बरोबर सुद्धा सर्व्ह करू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
चिकन मॅरिनेट करा:
250 ग्राम चिकन
¼ कप दही
¼ टी स्पून हळद
1 टी स्पून मीठ किंवा टेस्ट नुसार
मसाला करिता:
1 टे स्पून तेल
2 मोठे कांदे (सोलून चिरून)
7-8 लसूण पाकळ्या
1” आले तुकडा
2 लहान हिरव्या मिरच्या (तुकडे करून)
2 टे स्पून काजू
½ टी स्पून खसखस
चिकन ग्रेव्ही करिता:
1 टे स्पून तेल
5-6 मिरे, 1 तमालपत्र
2 लवंग, 1 टी स्पून शहाजिरे
½” दालचीनी तुकडा, थोडशी जायपत्री
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून गरम मसाला
1 टी स्पून धने-जिरे पावडर
मीठ चवीने
1 टे स्पून फ्रेश क्रीम
कोथिंबीर चिरून
कृती:
चिकन मॅरिनेट करण्यासाठी: चिकन स्वच्छ धुवून एका बाउलमध्ये ठेवा त्याला मीठ, हळद, दही व लाल मिरची पावडर लावून मिक्स करून 30 मिनिट झाकून बाजूला ठेवा.
मसाला करिता: कांदा चिरून घ्या, लसूण सोलून घ्या. एका कढईमध्ये तेल गरम करून चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या. मग त्यामध्ये खसखस, काजू, , आल, लसूण, हिरवी मिरची घालून थोडे परतून विस्तव बंद करा. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्या.
कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मिरे, तमालपत्र, लवंग, शहाजिरे, दालचीनी तुकडा, थोडशी जायपत्री घालून वाटलेला मसाला घाला व चांगला परतून घ्या. मसाला परतून आल्यावर त्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन घालून परतून घ्या. मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, गरम मसाला, धने-जिरे पावडर, फ्रेश क्रीम, मीठ घालून 1 कप पाणी घालून मिक्स करून घ्या. (गरज वाटल्यास अजून थोडे पाणी घालू शकता) झाकण ठेवून 15 मिनिट मंद विस्तवावर चिकन शिजवून घ्या.
गरमा गरम टेस्टि झणझणीत चिकन रस्सा कोथबीरीने सजवून सर्व्ह करा.