बटाटा आपल्या घरी नेहमी असतोच कारण की त्याचा वापर आपण बऱ्याच प्रमाणात करत असतो तसेच तो आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह सुद्धा आहे पण जेव्हा आपण बटाटा साला सकट सेवन करतो तेव्हा तो जास्त आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह असतो.
बटाटा सर्व जण अगदी आवडीने खातात. किंवा त्याचे विविध पदार्थ सुद्धा बनवतात. आपण जेव्हा बटाट्याची भाजी बनवतो तेव्हा त्याची साल काढून ते फेकून देतो. जर तुम्ही सुद्धा असे करत असाल तर तुमची सवय बदला.
The Marathi language video Potato Peels Benefits in Marathi can of be seen on our YouTube Channel of Home Remedy For Potato Peels For Skin And Hair
बटाटा ही भाजी अशी आहे की आपण कोणत्यापण भाजी मध्ये घालून बनवू शकतो व ती भाजी मस्त लागते. असे क्वचित होईल की ज्याना कोणाला बटाटा भाजी आवडत नाही. बटाट्याची भाजी बनवताना आपण ते धुवून त्याची साल काढून फेकून देतो. पण तुम्हाला त्याचे फायदे काय आहेत ते समजल्यावर अगदी खूप आश्चर्य वाटेल की ही साल आपल्या खूप कामाची आहेत. आज आपण बटाट्याच्या सालचे फायदे पहाणार आहोत त्यानंतर तुम्ही ती साल कधीच फेकून देणार नाहीत.
बटाट्याच्या सालीमध्ये खूप पोषक तत्व आहेत.
बटाटा मध्ये प्रोटीन, कार्बोहाइड्रेट्स, पोटैशियम,विटामिन सी, विटामिन बी6 व थियामिन असे न्यूट्रिएंट्स चा चांगला सोर्स आहे. पण बटाटाच्या पोषक तत्व पेक्षा जास्त तत्व त्याच्या साला मध्ये आहेत. म्हणून बटाटा वापरताना त्याच्या साली सकट वापरावा.
बटाट्याच्या सालीचे फायदे:
आपल्या चेहऱ्यावरील डार्क सरकल्स वरती बटाट्याची साल उपयोगी
आपल्या डोळ्याच्या खालील डार्क सरकल्सच्या साठी बटाटा साले उपयोगी आहेत. जर आपली स्कीन ऑईली आहे व त्यामुळे पिंपल्स व ब्लॅक हेंड्स च्या समस्या होत आहेत तर त्यासाठी ही साल उपयोगी आहेत.
केसांसाठी उपयोगी बटाट्याची साल:
बटाट्याची साल मिक्सरमध्ये वाटून त्याचा जूस डोक्याला लावावा. त्यामुळे केसांची चांगली वाढ होते. जर तुम्ही पांढरे केस होण्यामुळे त्रस्त असाल तर पुढील उपाय मस्त आहे. एका भांड्यात एक कप बटाटा साल घेऊन त्यामध्ये अर्धा लीटर पाणी घेऊन गरम करायला ठेवा. पाणी घट्ट होई पर्यन्त आटवायचे म्हणजे 2-3 चमचे राही पर्यन्त आटवायचे मग ते पाणी केसांना लावावे असे थोडे दिवस चालू ठेवावे मग त्याचे चांगले परिणाम आपल्याला दिसून येतील.
ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवते बटाटा साल:
डायबिटीज व ब्लड शुगर ज्याना आहे त्यांना बटाटा खाणे वर्ज असते. कारण की त्यामुळे ब्लड मधील ग्लुकोज लेवल वाढते. पण साला सकट बटाटे वापरले तर त्यामुळे शरीराला जास्तीचे फायबर मिळते त्यामुळे ब्लड शुगर लेवल कंट्रोल मध्ये राहते.
पोटाचे आरोग्य चांगले राहते
बटाट्याच्या सालामध्ये फाईबर आहे त्यामुळे मेटाबॉलिज्म चे योग्य राहून त्या बरोबर कबज च्या समस्या पासून छुटकारा मिळतो.
एनीमिया असणाऱ्या लोकानी बटाटा साला सकट सेवन करावा
जर कोणत्या व्यक्तिच्या शरीरात रक्त कमी आहे त्यामुळे ती व्यक्ति एनीमिया सारख्या रोगानी त्रस्त आहे तर त्यांनी हिरव्या भाज्याच्या बरोबर बटाटे साला सकट वापरुन मग त्याचे सेवन करावे. कारण की बटाटाच्या सालामध्ये आयर्न असते. जे रेड ब्लड सेल्स चे फंक्शन ला बरोबर ठेवते.