आपण बाजारात गेलोकी आपल्याला लाल चुटुक टोमॅटो दिसले की आपण लगेच घेतो. टोमॅटो खाण्याचे बरेच फायदे आहेत. टोमॅटो आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे.
आपण आपल्या रोजच्या जेवणात टोमॅटोचा अगदी सरास वापर करतो. त्यामुळे आपल्या जेवणाला चव सुद्धा येते. आपण भाजी किंवा आमटीमध्ये टोमॅटो वापरतो त्याशिवाय आपली भाजी किंवा आमटी टेस्टी लागत नाही. टोमॅटोची भाजी, सूप किंवा सार आपण नेहमी बनवतो. त्याच बरोबर त्याची चटणी सुद्धा मस्त टेस्टी लागते. टोमॅटो चटणी बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे.
The Marathi language video Spicy Tomato Chutney in Marathi can of be seen on our YouTube Channel of Zatpat Easy Spicy Tomato Chutney
टोमॅटो चटणी बनवताना आपण कांदा किंवा लसूण वापरणार नाही. त्याच्या शिवाय सुद्धा चटणी मस्त लागते. टोमॅटोची चटणी आपण मोमोज बरोबर किंवा ब्रेडला लाऊन सुद्धा सर्व्ह करू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 15 मिनिट
वाढणी: 2 जणसाठी
साहित्य:
2 मध्यम आकाराचे टोमॅटो
1 टे स्पून तेल
½ टी स्पून जिरे
¼ टी स्पून मेथी दाणे
एक पिंच हिंग
दोन पिंच हळद
3-4 लाल सुक्या मिरच्या
मीठ चवीने
कृती: प्रथम टोमॅटो धुवून चिरून घ्या. एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे व मेथी दाणे घालून लाल सुक्या मिरच्या, हिंग, हळद घालून एक मिनिट गरम करून त्यामध्ये चिरलेले टोमॅटो व मीठ चवीने घालून मिक्स करून दोन मिनिट मंद विस्तवावर शिजवून घ्या. दोन मिनिट नंतर विस्तव बंद करून थंड होऊ द्या.
मग मिश्रण थंड झाल्यावर मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या. वाटलेली टोमॅटो चटणी बाउलमध्ये काढून घ्या.
टेस्टी झणझणीत टोमॅटो चटणी सर्व्ह करा.