मुलांचा अभ्यास म्हणजे आई-वडिलांची डोके दुखी सुरू होते. आजकाल अभ्यासा बद्दल खूप स्पर्धा चालू आहे त्यामुळे प्रतेक आई-वडील अतोनात प्रयत्न करीत असतात की त्यांची मूल सुद्धा बाहेरील स्पर्धे मध्ये पुढे असावी. त्यासाठी काहीही करून ते आपल्या मुलांनचा चांगल्या शाळेत प्रवेश घेतात. जर एव्हडे करून सुद्धा मूल जर अभ्यासात लक्ष देत नसेल तर ते खूप चिंतित होतात ते पण स्वाभाविक आहे. वास्तु शास्त्र नुसार घरात काही दोष असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा येते व मुलांचे अभ्यासात लक्ष एकाग्रीत होत नाही व मुलांना अभ्यास करताना लवकर कंटाळा येतो . वास्तु शास्त्रा नुसार मुलांच्या रूममध्ये जर काही बदलाव केला तर मुलांचे अभ्यासात मन एकाग्रीत होऊ शकते.
The Marathi language video Vastu tips for Children’s Study or educations and growth in Marathi can of be seen on our YouTube Channel of Vastu Tips for school going children study and growth
आपली मूल जेव्हा अभ्यासाला बसतात तेव्हा नीट लक्ष ठेवा की त्यांचे तोंड कोणत्या दिशेला आहे. वास्तु शास्त्रा नुसार जर अभ्यासाला बसताना तोंड दक्षिण दिशेला असेल तर मुलांमध्ये शिस्तीचा अभाव येतो. त्यामुळे तो अभ्यास करत नाही. म्हणून मूल अभ्यासाला बसताना लक्ष ठेवा की ते कोणत्या दिशेला तोंड करून बसली आहेत. म्हणजेच दक्षिण दिशेला तोंड करून बसली नाहीना. जर तुमच्या कडे जागेचा अभाव आहे त्यामुळे स्टडी रूम अशी वेगळी नाही व मूल बेडरूम मध्ये अभ्यासाला बसली आहेत तर लक्षात ठेवा की मुलाचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला पाहिजे.
मूल जेव्हा अभ्यासात लक्ष केंद्रीत करत नसेल तर स्टडी टेबलवर ग्लोब किंवा तांबे ह्या धातूचा पिरमिड ठेवा. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन मूल अभ्यासात लक्ष केंद्रित करू शकतात.
मुलांच्या स्टडी रूममध्ये टीव्ही, विडीओ प्लेयर किंवा सीडी प्लेयर ठेवता कामा नये. त्यामुळे मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही. जर असेल तर त्याचे कनेक्शन बंद करून ठेवा.
मुलांच्या स्टडी रूममध्ये घडयाळ किंवा पाणी ठेवायचे असेल तर उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवा.
मुलाचे अभ्यासात लक्ष लागत नसेल तर रूममध्ये मोरपंख, श्री गणेश किंवा माता सरस्वतीचा फोटो लावावा.
स्टडी टेबल नेहमी स्वच्छ ठेवावे त्यावर धूल असू नये. स्टडी टेबल नेहमी आयात किंवा चौकोनी असावे तुटलेले नसावे तसेच उत्तर दिशेला ठेवावे म्हणजे सकारात्मक ऊर्जा येते, मुलाचे अभ्यासात लक्ष लागते व स्मरण शक्ति वाढते.
स्टडी रूममध्ये उधळलेले घोडे किंवा सूर्य उगतानाचा फोटो लावावा तसेच मुलांची सर्टिफिकेट किंवा मेडल लावावी. हिंसा किंवा दुखी अशी छाया चित्र लाऊ नये.