आपण ह्या अगोदर वेज पुलाव कसा बनवायचा टे पहिले आता आपण सोया चंक वेज पुलाव कसा बनवायचा टे पाहू या. सोया आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. सोयाबीनमध्ये प्रोटिनचे प्रमाण अधिक आहे. सोया चंक वापरुन आपण बऱ्याच डिश बनवू शकतो. पण पुलाव ही एक डिश सुद्धा मस्त लागते.
The Marathi language video Soya Chunk Pulao in Marathi can of be seen on our YouTube Channel of Soya Chunk Fried Rice or Pulao For Kids Tiffin
आपल्याला कोणत्या सुद्धा किराणा मालाच्या दुकानात सोया चंक मिळू शकतात. सोया चंक पुलाव बनवताना भाज्या सुद्धा वापरल्या आहेत. तसेच वन डिश मिल सुद्धा आपण म्हणू शकतो. त्या बरोबर एखादा तळणीचा पदार्थ बनवला तरी चालतो.
सोया चंक मुले शाळेत जाताना डब्यात सुद्धा नेऊ शकतात.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहीत्य:
1 कप बासमती राईस
1 कप सोया चंक
1 छोटा कांदा (उभा पातळ चिरून)
1 छोटे गाजर (चिरून)
2 टे स्पून मटार
1 टे स्पून आल-लसूण पेस्ट
मीठ चवीने
1 टी स्पून लाल मिरची पावडर
¼ टी स्पून हळद
¼ टी स्पून गरम मसाला
कोथबिर पुदिना पाने (चिरून)
मसाला करिता:
1 टी स्पून बडीशेप
3 लवंग
2 वेलदोडे
1/2 “ दालचीनी
फोडणी करिता:
1 टे स्पून तेल
1 टी स्पून जिरे
5-6 मिरे
2-3 लवंग
½” दालचीनी
1 तमाल पत्र
कृती: प्रथम तांदूळ धुवून बाजूला ठेवा. कांदा, गाजर, कोथबिर पुदिना चिरून घ्या.
एका पॅनमध्ये बडीशेप, लवंग, दालचीनी, वेलदोडे कोरडे मंद विस्तवावर 2 मिनिट भाजून घ्या. थंड झाल्यावर कुटून घ्या.
एका भांड्यात पाणी गरम करून थोडेसे मीठ घालून त्यामध्ये सोया चंक घालून झाकण ठेवा व विस्तव बंद करून 10 मिनिट तसेच झाकून ठेवा. 10 मिनिट झाल्यावर त्यातील पाणी दाबून काढून टाका. मग एका बाउलमध्ये सोया चंक घेऊन त्याला मीठ, लाल मिरची पावडर व गरम मसाला लावून मिक्स करून झाकून बाजूला ठेवा.
नॉन स्टिक पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे, लवंग, दालचीनी, तमाल पत्र घालून उभा चिरलेला कांदा घालून 2 मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये आल-लसूण घालून परतून घ्या. आता त्यामध्ये चरलेले गाजर, मटार व सोया चंक घालून, लाल मिरची पावडर व थोडीशी हळद घालून मिक्स करून थोडेसे मीठ घालून झाकण ठेवा 2-3 मिनिट मंद विस्तवावर भाज्या शिजू द्या.
आता झाकण काढून त्यामध्ये धुतलेले तांदूळ व थोडेसे मीठ घालून तांदळाच्या दुप्पट गरम पाणी घालून मिक्स करून एक उकळी आलीकी झाकण ठेवा व 5 मिनिट मंद विस्तवावर पुलाव शिजू द्या. 5 मिनिट झाल्यावर झाकण काढून कोथबिर व पुदिना घालून मिक्स करून 2 मिनिट भात शिजू द्या. नंतर विस्तव बंद करून तसेच 5-10 मिनिट पुलाव झाकून ठेवा.
गरम गरम वेज सोया चंक फ्राइड राइस अथवा पुलाव कोथबिरने सजवून सर्व्ह करा.