आपली स्कीन त्वचा एकदम मुलायम व निरोगी राहण्यासाठी आपण बरेच घरगुती प्रयोग करत असतो. त्यासाठी आपण बाजारातून महागडी क्रीम आणून लावत असतो तसेच बरेच निरनिराळे प्रयोग सुद्धा करून पाहतो. त्याचा बरेच वेळा वाईट परिणाम सुद्धा होतो. त्यापेक्षा आपण काही घरगुती टिप्स किंवा ट्रिक्स वापरुन आपण आपली स्कीन छान बनवू शकतो. ते सुद्धा घरगुती साहित्य वापरुन अगदी स्वस्त व मस्त.
The Marathi language video Benefits of using Curd for skin in Marathi can of be seen on our YouTube Channel of Dahi Curd Face pack and its benefits
आपण ही एक छान सोपी पद्धत किंवा वापरुन आपली स्कीन छान मुलायम केली आहे का? तर आपण आज दही वापरुन आपली स्कीन चमकदार व मुलायम बनवणार आहोत ते कसे ते आपण पाहू या.
आपण आपल्या स्कीन साठी दही वापरले तर आपल्या स्कीनला खूप फायदेमंद आहे. त्यामुळे आपल्या स्कीला पोषक तत्व मिळतात त्यामुळे स्कीनचा रंग उजळतो तसेच स्कीन चे काही प्रॉब्लेम असतील तर ते सुद्धा निघून जातील. काळे डाग, वाढत्या वयामुळे सुरकुत्या, मुरूम पुटकुल्या ठीक करण्यासाठी फायदेमंद आहे. जर आपण दह्यामध्ये अजून काही मिक्स करून वापरले तर अजून फायदेमंद होईल. आपण दह्यामध्ये लिंबुरस, टोमॅटोरस किंवा अजून काही मिक्स करून लावल्यास फायदेमंद होईल. जर तुम्हाला चांगले रिजल्ट पाहिजे असतील तर आठोडयातून दोनवेळा आपल्या स्कीनला दही लावू शकता.
1. बऱ्याच महिला किंवा मुली ह्यांना मासिक पाळी च्या वेळेस पिंपल्सचा त्रास होतो. जर तो त्रास कमी करायचा असेल तर सर्वात पहिले आपला चेहरा स्वच्छ धुवून टॉवेलने कोरडा करून जेथे पिंपल्स आले आहेत तेथे दही लाऊन 15 मिनिट तसेच ठेवावे. मग आपला चेहरा स्वच्छ धुवावा.
2. जर आपली स्कीन खूप ड्राय आहे तर आपल्या शेरीरात पाण्याचा अभाव आहे असे समजावे. पहिला उपाय म्हणजे भरपूर पाणी प्या. मग आपल्या चेहऱ्यावर दहीचा लेप लावून थोडा वेळ तसेच ठेवून मग आपला चेहरा स्वच्छ धुवावा पाहिजे असेल तर मध सुद्धा मिक्स करून शकता.
3. दहीचा फेस पॅक लावल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो. डेड स्कीन साफ होते व चेहऱ्यावर निखार येतो. दही हातात घेऊन 15 मिनिट चेहऱ्यावर मसाज करावा. मग थोडे तसेच ठेवून कोमट पाण्यानी चेहरा स्वच्छ धुवावा.
4. जर आपल्या चेहऱ्यावर बरेच डाग व धब्बे आहेत तर दही लावावे. त्याने आपल्या चेहऱ्यावर निखार येईल. दह्यामधील प्रोटिन रंग चांगला करण्यास मदत करते. दह्याचा पॅक चेहऱ्यावर लावून थोडा वेळ तसेच ठेवावे. त्यामुळे पोषक तत्व मिळतील व डाग धब्बे निघून जातील.
5. आपली झोप बरोबर होत नसेल तर डोळ्याच्या खाली काळी वर्तुळ होतात. तसेच चुकीच्या खाण्याच्या पद्धतीने सुद्धा काळी वर्तुळ येतात. तेव्हा दहीचा पॅक लावणे खूप फायदेमंद आहे.
दहीच्या वरील उपाय बरोबर दह्यामुळे ब्लॅक हेंड्स दूर होऊन टॅन झालेली स्कीन सुद्धा चांगली होण्यास मदत होते.