हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्व आहे. धार्मिक कार्यात तुळशीला खूप महत्व आहे त्याच बरोबर तुळशीचे औषधी गुणधर्म सुद्धा आहेत. असे म्हणतात की घरात तुळशीचे रोप लावले तर घरातील निगेटिव्ह एनर्जी दूर होते. बरेच लोक सकाळी उठल्यावर तुळशीच्या पानाचा चहा सेवन करतात. मला तुम्हाला एक गोष्ट सांगाविशी वाटते की कोणत्या दिवशी तुळशीची पान तोडू नये. त्याच बरोबर तुळशीचे पान तोडण्यासाठी काय काळजी घ्यावी. उन्हाळा ह्या सीझनमध्ये सुद्धा तुळशी फ्रेश व थंड असते. आपण जाणून घेऊ या की तुळशीचे महत्व काय आहे.
The Marathi language Don’t Pluck or Cut Tulsi Leaves on This Day in Marathi can of be seen on our YouTube Channel of Don’t Pluck or Cut Tulsi Leaves on This Day
तुळशीचे पान ह्या दिवशी चुकून सुद्धा तोडू नका.
असे म्हणतात की रविवार, सूर्य ग्रहण, एकादशी, संक्रान्ति, द्वादशी, चंद्रग्रहण व संध्याकाळी तुळशीचे पान तोडू नये. एकादशी ह्या दिवशी तुळशी माता उपवास करते त्यामुळे ह्या दिवशी तुळशीचे पान तोडू नये नाहीतर घरात गरीबी येते. तसेच घरात तुळशीचे रोप घराच्या अंगणात मधोमध लावावे किंवा उत्तर-पूर्व ह्या दिशेला लावावे त्यामुळे शुभ फळे मिळतात. कारण की उत्तर-पूर्व ही दिशा कुबेर भगवानची दिशा मानली जाते. तसेच घरात सारखे कलह किंवा भांडणे होत असतील तर दक्षिण-पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावले. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा जाऊन घरात शांती येते. दक्षिण दिशेला तुळशीचे रोप लावू नये ते अशुभ मानले जाते. रविवार ह्या दिवशी तुळशीचे पान तोडू नये. महाशिवरात्री ह्या दिवशी चुकून सुद्धा तुळशीचे पान वाहू नका ते पूर्णपणे वर्जित आहे. काही लोक मंगळवार ह्या दिवशी तुळशीचे पान तोडणे अशुभ मानतात.
तुळशीची पान तोडताना खालील गोष्टी लक्षात घ्या.
तुळशीची पान तोडताना कधीसुद्धा ओढून किंवा ओरबडून काढू नये. किंवा नखानी तोडू नये.
तुळशीची पान कधी सुद्धा चाउन खाऊ नये जिभेवर ठेवून चघलावी. शास्त्रामध्ये तुळशीला राधाराणीचा अवतार मानले जाते.
आंघोळ न करता कधी सुद्धा तुळशीची पान तोडू नये. अशी पाने पूजेमध्ये चालत नाहीत. तुळशीचे रोप सुकले तर नदीमध्ये सोडावे.
तुळशी माताला राधाराणीचे रूप मानतात ती संध्याकाळी लीला करते त्यामुळे संध्याकाळी तुळशीची पान तोडू नयेत. जर समजा पान तोडायचीच असतील तर एकदा रोप हलवावे मग पान तोडावी.