डोसा ही साऊथमधील अगदी लोकप्रिय डिश आहे. प्रेतक प्रांतात ही डिश अगदी आवडीने बनवली जाते. त्याच बरोबर भारताच्या बाहेर सुद्धा अगदी आवडीने ही डिश बनवली जाते. डोसा म्हंटले की मुलांना खूप आवडतो. आपण नष्टयला किंवा जेवणात सुद्धा डोसा बनवतो. मग आपण त्याच्या बरोबर बटाट्याची भाजी, सांबर व चटणीसुद्धा बनवतो.
The Marathi language American Dosa With Mayonnaise Sauce For Kids in Marathi can of be seen on our YouTube Channel of Dosa for kids breakfast
आता अमेरिकामध्ये सुद्धा आपला डोसा लोकप्रिय झाला आहे. पण त्यामध्ये थोडा बदल करून बनवतात. सांबर, बटाटा भाजी किंवा चटणीच्या आयवजी तेथील लोकप्रिय सॉस बनवून डोसा सर्व्ह करतात.
आज आपण डोसा विदाउट चटणी पण विथ सॉस व बटाटा भाजी च्या आयवजी दुसरे सारण किंवा स्टफिंग कसे बनवायचे ते पाहू या.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 8-10 डोस बनतात
साहीत्य:
डोसा करिता:
1 कप तांदूळ
1 कप उदीडदाळ
मीठ चवीने
तेल डोस फ्राय करण्यासाठी
स्टफ करण्यासाठी:
1 कप स्वीट कॉर्न दाणे (उकडून)
मिरे पावडर व मीठ चवीने
मियोनीज सॉस कसा बनवायचा:
1 कप दूध
1 अंडे (पिवळा योक फक्त)
1 टे स्पून कॉर्न फ्लोर
1 टी स्पून मोहरी डाळ (कुटून)
1 टी स्पून साखर
1 टी स्पून तेल
मीठ व मिरे पावडर चवीने
1 टे स्पून व्हेनिगर
कृती: डोसाकरिता: प्रथम तांदूळ, उदीडदाळ व मेथी दाणे धुवून वेळवेगळे पाण्यात 4-5 तास भिजत ठेवा. मग मिक्सरमध्ये तिन्ही ग्राइंड करून घेऊन एका भांड्यात काढून 5-6 तास झाकून बाजूला ठेवा.
मियोनीज सॉस: मियोनीज सॉस बनवताना एका बाउलमध्ये एक अंडे फोडून फक्त त्याचा यल्लो योक घ्या. (पांढरा भाग बाजूला काढून ठेवा.) मोहरीची डाळ थोडी कुटून घ्या. मिरे पावडर कुटून घ्या. मग यल्लो योक फॉर्कने फेटून घ्या. मग त्यामध्ये कॉर्नफ्लोर, साखर, मीठ चवीने, निम्मी मोहरीची कुटलेली डाळ चांगली मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये हळू हळू दूध मिक्स करून घ्या. गुठळी होता कामा नये. मग भांडे मंद विस्तवावर ठेवून मिश्रण हलवत रहा. मिश्रण हळू हळू घट्ट होऊ लागेल. मिश्रण घट्ट व्हायला लागले की विस्तव बंद करून मिश्रण थंड करायला ठेवा. मिश्रण कोमट झाली की त्यामध्ये व्हेनिगर व बाकीची राहिलेली मोहरीची पावडर, मिरे पावडर घालून मिक्स करून घ्या.
स्वीट कॉर्नचे दाणे उकडून त्याला मीठ व मिरे पावडर लाऊन मिक्स करून घ्या.
डोसा बनवण्यासाठी नॉन स्टिक तव्याला तेल लाऊन घ्या. मग तवा ग झाल्यावर एक मोठा डाव डोशाचे मिश्रण घालून पसरवून घ्या. बाजूनी थोडेसे तेल सोडा मग दोन्ही बाजूनी डोसा भाजून झालकी खाली प्लेटमध्ये उतरवून घ्या. मग त्यावर मियोनीज सॉस लावून त्यावर स्वीट कॉर्नचे दाणे पसरवून डोसा गोल गुंडाळून घ्या. मग मस्त पैकी सर्व्ह करा.
अश्या प्रकारे सर्व डोस बनवून सर्व्ह करा.