आपण आपल्या नखांची खूप काळजी घेत असतो. नख नेहमी साफ ठेवावी तसेच वेळच्या वेळी ती कापावी. त्यावर आपले आरोग्य सुद्धा बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते.
नाखान वरती पांढरे डाग पडले की त्याची सुंदरता कमी होते पण नखांवरती पांढरे डाग पडणे म्हणजे आपल्या आरोग्याच्या काही समस्या आहेत असे समजावे. आपल्याला माहीत आहे का आपल्या नखांच्या आरोग्या वरती आपले आरोग्य अवलंबून आहे. तर नेहमी आपली नख पहा तुम्हाला त्याच्यातिल बदल लक्षात येईल की त्याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होत आहेत.
आपण पाहू या की नखांमधील बदल आपल्या आरोग्याचे काय संकेत देत आहेत.
The Marathi language video nails health indication in Marathi can of be seen on our YouTube Channel of nail colour and disease
पिवळी नख किंवा नखांचा रंग हलका होणे:
जर तुमच्या नखांचा रंग हलका किंवा फिकट झाला आहे किंवा त्याच्या वर फिकट पिवळा रंग आला आहे किंवा नख कमजोर दिसत असतील तर असे समजावे की अनीमिया, लिवर संबंधीत रोग किंवा मालन्यूट्रीशन चे लक्षण होऊ शकते.
पांढरी नख दिसणे:
बरेच वेळा आपल्या नखांवर पांढरे डाग दिसून येतात किंवा हळू हळू नख पांढरी पडायला लागतात तेव्हा असे समजावे की लिव्हर संबंधित काही बिघाड आहे.
पिवळी नख दिसणे:
पिवळी नख दिसणे म्हणजे बहुतेक करून फंगल इन्फेक्शन असू शकते. काही वेळेस त्याचे निदान असे सुद्धा असू शकते की थाइरॉयड, हृदय संबंधित रोग, डायबिटीज किंवा सिरोसिस सारखे गंभीर रोगाचे लक्षण असू शकते. तेव्हा लगेच डॉक्टरि सल्ला घ्यावा.
निळी नख दिसणे:
काही वेळेस आपल्या शरीराला ऑक्सिजन पुरवठा योग्य प्रकारे मिळत नसेल तर नखांच्या वर निळ्या रंगाची झाक येते. तेव्हा हृदय संबंधित काही बदल, निमोनिया ह्या सारखी काही लक्षण असू शकतात.
नखांवरती चिरा पडणे किंवा क्रैक येणे:
बऱ्याच वेळा आपली नख कोरडी पडून त्यावर क्रैक होतात असे बरेच दिवसांपासून होत असेल तर असे समजावे की थॉयरायड रोग संबंधित काही तक्रार आहे. किंवा नखान वरती पिवळा रंग येणे व क्रैक येणे म्हणजे फंगल इन्फेक्शन सुद्धा असू शकते.
आपल्या नखान वर असे काही प्रभाव दिसले तर वर दिलेले बदल असे शकतातच असे नाही तरी पण आपण डॉक्टरी सल्ला घेणे योग्य ठरेल.