ब्रोकोली ही भाजी इटालियन असली तरी आपण तिचे वेगवेगळे पदार्थ ते पण इंडियन पद्धतीने बनवू शकतो. ह्या अगोदर आपण ब्रोकोलीचे औषधी गुणधर्म पाहिले त्यानंतर आपण ब्रोकोलीची अगदी सोप्या पद्धतीने भाजी व सूप कसे बनवायचे पाहिले.
आता आपण ब्रोकोली वापरुन सॅलड कसे बनवायचे ते पाहू या. ब्रोकोली पासून सॅलड बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहे. जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर अश्या प्रकारचे सॅलड सेवन करा त्यामुळे नक्की फायदा होईल. जर कोणी घरी पाहुणे येणार असतील तर अश्या प्रकारचे ब्रोकोली सॅलड बनवा अगदी पौस्टीक व आकर्षक दिसेल.
ब्रोकोली आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. ब्रोकली मध्ये खूप सारे गुण आहेत. त्यामध्ये प्रोटिन, कॅल्शियम, कार्बोहाइड्रेट, आयर्न, विटामीन ए, सी व अजून पोषक तत्व आहेत.
The Marathi language video Healthy Broccoli Salad in Marathi can of be seen on our YouTube Channel of Nutrition Broccoli Salad
ब्रोकोली हृदय रोगासाठी गुणकारी, कॅन्सर होण्यापासून बचाव, रोग प्रतिकार शक्ति वाढते, आपला मूड चांगला राहतो, गर्भावस्थामध्ये खूप फायदेशीर, वजन कमी करण्यास मदत, लिवरच्या आरोग्यासाठी ब्रोकोली, दात व हाड ह्याचे आरोग्य चांगले राहते, ब्रोकली पासून आपल्या शरीराची पचन शक्ति सुधारते.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 2 जणसाठी
साहीत्य:
2 कप ब्रोकोली तुरे (छोटे छोटे)
10-12 बदाम (भिजवलेले)
½ टी स्पून लिंबुरस
1 टे स्पून ऑलिव्ह ऑइल
½ टी स्पून मिरे पावडर
2 टे स्पून कोथिंबीर (चिरून)
मीठ चवीने
कृती: प्रथम बदाम पाण्यात भिजत ठेवा. ब्रोकोलीचे तुरे कापून घ्या. एका भांड्यात पाणी गरम करून त्यामध्ये ब्रोकोलीचे तुरे घालून झाकण ठेवून 2-3 मिनिट तसेच ठेवा. मग पाण्यातून तुरे काढून बाजूला ठेवा. असे केल्याने ब्रोकोलीचा हिरवा ताजा रंग तसाच राहतो व आपले सॅलड अगदी आकर्षक दिसते.
एका भांड्यात एक कप पाणी गरम करायला ठेवा त्यावर चाळणी ठेवून त्या चाळणीत ब्रोकोलीचे तुरे व भिजवलेले बदाम घालून चाळणीवर झाकण ठेवून मंद विस्तवावर 12-15 मिनिट वाफवून घ्या. मग विस्तव बंद करून ब्रोकोली एका बाउलमध्ये काढून घ्या. मग त्यामध्ये लिंबुरस, मिरे पावडर, मीठ चवीने, ऑलिव ऑइल व कोथिंबीर घालून मिक्स करून सर्व्ह करा.