प्रत्येक वर्षी फाल्गुन महिन्यात पूर्णिमा ह्या दिवशी होळी हा सण असतो व दुसऱ्या दिवशी कृष्ण पक्ष प्रतिपदा ह्या दिवशी धूलवड खेळतात. ह्या वर्षी 28 मार्च 2021 रविवार ह्या दिवशी होळी आहे. व 29 मार्च 2021 सोमवार ह्या दिवशी धूलवड आहे. धार्मिक दृष्टीने हे दोन्ही दिवस शुभ मानले जातात. होळी ह्या दिवसाला सत्याची जीत असे म्हणतात त्याच बरोबर भक्त प्रहलाद ह्याच्या जीवंत राहण्याच्या खुशीमध्ये धूलिवंदन साजरा करतात. ज्योतिष शास्त्र नुसार ह्या दिवशी काही विशेष उपाय केले तर आपल्या जीवनातील समस्या दूर होतील. चला तर आपण पाहू या की कोणत्या राशीने कोणते उपाय केले पाहिजे.
The Marathi language Different style Holi 2021 chya Diwashi Rashi Anusaar Upaay Karun Sarvh Samasya Dur Kara in Marathi can of be seen on our YouTube Channel of Holi 2021
मेष राशि:
ह्या राशीच्या लोकानी शेंडी असलेला नारळ घेऊन त्यावर लाल रंगाचा धागा बांधून देवघरात ठेवून त्याला हळद, कुंकू, अक्षता व बत्तासे ठेऊन पूजा करून मग होळीच्या दिवशी होळीमध्ये नारळ ठेवा. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहून अडचणी दूर होतील.
वृषभ राशि:
होळीच्या दिवशी एका गुलाबी रंगाच्या कापडात 11 पूजेच्या सुपारी, 5 कौड्या गुंडाळून त्यावर चंदन लावून आपल्या शरीरावरून 7 वेळा उतारा करून होळीच्या अग्निमध्ये विसर्जित करा. त्यामुळे आपल्या नोकरी, धंदा संबंधीत अडचणी दूर होतील. पतीने पत्नीला गुलाबी रंग लावावा त्यामुळे भांडण दूर होतील.
मिथुन राशि:
होळीच्या दिवशी श्री गणेशजीच्या समोर तुपाचा दिवा लाऊन 27 मखाने ठेवावे. मग श्री गणेश व चंद्राची पूजा करावी. मग मखाने हातात घेऊन आपल्या समस्या बोलून मखाने होळीमध्ये सोडावे. त्यामुळे नोकरी संबंधित समस्या दूर होतील.
कर्क राशि:
होळीच्या दिवशी गहू व तांदळाचे पीठ मिक्स करून चौमुखी दिवा बनवून त्यामध्ये तिळाचे तेल घालून घरच्या मुख्य दरवाजावर हा दिवा लावावा. आपले वैवाहिक जीवन चांगले जाण्यासाठी जवसचे 27 दाणे होळीच्या मध्ये सोडून शिवलिंगवर लाल रंग अर्पित करावा.
सिंह राशि:
होळीच्या दिवशी एक खायचे पान घ्या. 1 सुपारी, 1 बत्तासा व 2 लवंग तुपात भिजवून पानावर ठेवा मग ह्या सर्व वस्तु हातात घेऊन आपल्या शरीरावरून 7 वेळा उतारा करून होळीमध्ये सोडावे. त्यामुळे आपले बिघडलेले काम पूर्ण होईल.
कन्या राशि:
होळीच्या दिवशी 11 लवंग जोडी (22 लवंग) व 11 दुर्वाच्या 11 जोडी घेऊन घरातील सर्व लोकानी हात लाऊन देवघरात ठेवावे. त्यामुळे घरातील सदस्यांचा वाईट नजरे पासून बचाव होईल. तसेच होळीच्या दिवशी घरातील सदस्यांना हिरवा रंग लावावा म्हणजे संबंध चांगले राहतील.
तुला राशि:
पिंपळाचे पान घेऊन त्यावर अक्षता, 1 जायफळ, मिश्री घेऊन पूर्ण घरात फिरवून मग होळीमध्ये सोडावे. तसेच आपल्या घरच्या समोर कुंकूणे ॐ चे चिन्ह काढावे. त्यामुळे घरातील कलह दूर होईल.
वृश्चिक राशि:
एक पान घेऊन त्यावर एक सुपारी, 5 कमलगट्टे तुपामध्ये भिजवून ठेवा मग श्री हनुमानजीनचा मंत्र ‘ॐ हनुमते नमः’ 27 वेळा म्हणा. जाप पूर्ण झाल्यावर सर्व चीजे होळीमध्ये सोडा. त्यामुळे शनिची पिडा होणार नाही. व व्यवसायातिल अडचणी दूर होतील.
धनु राशि:
एक मूठ 7 धान्य घेऊन एक सुक्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये ठेवून पूजाघरमध्ये ठेवा. मग आपल्या कपाळावर लावून होळीमध्ये ठेवा. त्यामुळे नवग्रहची पीडा होणार नाही.
मकर राशि:
एक पिंपळाचे पान घेऊन त्यावर काळे तीळ ठेवावे. मग ते पान घराच्या पश्चिम दिशेला ठेवावे. मग आपल्या वरून 7 वेळा उतरा करून होळीमध्ये सोडावे. त्यामुळे वाईट नजर दूर होऊन सगळ्या परेशानी दूर होतील. व्यापार संबंधीत लोकांना जांभळा रंग लावावा.
कुंभ राशि:
होळीच्या दिवशी आपल्या वयाच्या एव्हडे उडीद व पान घेऊन त्यावर ठेवावे. मग ते पान होळीमध्ये सोडावे. त्यामुळे धन दौलत संबंधित समस्या पासून सुटका होईल.
मीन राशि:
एका खायच्या पानावर हळकुंड, सुपारी, व कपूर ठेवून ते हातात घेऊन होळीला 7 प्रदक्षिणा मारून होळीमध्ये सोडावे. त्यामुळे मन शांत व प्रसन्न होईल. व शारीरिक कष्ट पासून मुक्ती मिळेल.