फाल्गुन महिन्याच्या पूर्णिमा ह्या दिवशी म्हणजेच 28 मार्च 2021 रविवार ह्या दिवशी होळी आहे. ह्या वर्षी होळी दहन अभिजीत मुहूर्त, ब्रह्म मुहूर्त च्या बरोबर सर्वार्थ सिद्धि योग व अमृत सिद्धि योग आहे. ज्योतिष शास्त्रमध्ये हा योग खूप शुभ मानला जातो. ज्योतिष शास्त्र नुसार होळी ही शुभ मुहूर्तवरच दहन केली पाहिजे. भद्रा व राहू ह्या काळामध्ये पूजा-अर्चा करू नये. होळी दहन शुभ मुहूर्तवर केल्यानेच आपल्या जीवनात सुख, शांती व समृद्धीची प्राप्ती होऊ शकते.
The Marathi language Holi Dahan 2021 Date, Time, Muhurat And Mantra in Marathi can of be seen on our YouTube Channel of Holi 2021 Dahan Muhurat, Mantra And Ahuti
राशिच्या अनुसार करा होळीची पूजा व आहुति:
मेष व वृश्चिक राशि असणाऱ्या लोकांनी गुळाची आहुति द्यावी
वृषभ राशि असणाऱ्या लोकांनी साखरेची आहुति द्यावी
मिथुन व कन्या राशि असणाऱ्या लोकांनी कापूरची आहुति द्यावी
कर्क राशि असणाऱ्या लोकांनी कमळ फुलाची आहुति द्यावी
सिंह राशि असणाऱ्या लोकांनी गुळाची आहुति द्यावी
तुळ राशि असणाऱ्या लोकांनी कपूरची आहुति द्यावी
धनु व मीन असणाऱ्या लोकांनी चणेची आहुति द्यावी
मकर व कुंभ असणाऱ्या लोकांनी तीळाची आहुति द्यावी
होळीच्या दहनाचे अशुभ मुहूर्त ह्या काळात पूजा पाठ करू नये.
राहुकाल – 5:06 PM – 6:37 PM
यम गण्ड – 12:32 PM – 2:03 PM
कुलिक – 3:34 PM – 5:06 PM
दुर्मुहूर्त – 04:59 PM – 05:48 PM
वर्ज्यम् – 01:06 AM – 02:32 AM
होलिचा दहन 2021 चा शुभ मुहूर्त:
हिंदू पंचांग नुसार 28 मार्च 2021 होळी दहनाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 6 वाजून 37 मिनिट पासून रात्री 8 वाजून 56 मिनिट पर्यन्त आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी धूलवड आहे.
शास्त्रानुसार असे म्हणतात की होळीच्या भस्मला खूप शुभ मानले जाते. त्याची राख कपाळावर लावावी त्यामुळे नकारात्मक शक्ति दूर होते.
होळीची राख घरातील कानाकोपऱ्यात शिंपडणे शुभ मानले जाते त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते.
जर कोणाच्या कुंडलीमध्ये ग्रहदोष आहे त्यांनी पाण्यात थोडी राख मिक्स करून शिवलिंग वर ते पाणी सोडावे त्यामुळे ग्रहदोष दूर होईल.
होळीच्या दिवशी शुभ मंत्र म्हणा
अहकूटा भयत्रस्तै: कृता त्वं होलि बालिशै:
अतस्वां पूजयिष्यामि भूति-भूति प्रदायिनीम।