आता थंडीच्या दिवसात कोथिंबीर अगदी छान हिरवीगार व तसेच स्वस्त सुद्धा मिळते. त्यानंतर उन्हाळा चालू झालाकी कोथिंबीर खूप महाग मिळते. तर मग आताच आपण कोथिंबीर साठवून ठेवली तर आपल्याला उन्हाळा ह्या सीझन मध्ये महागाची कोथिंबीर घ्यायला नको. तसेच जेव्हा पाहिजे तेव्हा आपण कोथिंबीर वापरू शकतो. म्हणजेच पोहे, उपीट, चटणी, आमटी ई. किंवा अजून कशासाठी.
आपण काही सोप्या ट्रिक्स वापरल्या तर अगदी काही मिनिटांत कोथिंबीर कशी टिकवायची ते सुद्धा बिना फ्रीज बाहेर अगदी वर्षभर ते आपण पाहूया.
The Marathi language video how to preserve coriander leaves for one year in Marathi can of be seen on our YouTube Channel of How to keep Coriander or Kothimbir Leaves for long time without refrigeration
प्रथम कोथिंबीर आणताना छान हिरवीगार ताजी कोथिंबीर बघून आणायची. मग त्याची मूळ कापून टाका देठा कडील थोडा भाग घ्या कारण देठांमद्धे छान सुगंध असतो. कोथिंबीर निवडून साफ करून पिवळी पाने किंवा खराब झालेली पाने काढून टाका.
एका मोठ्या आकाराचा ट्रे किंवा थाळी घेऊन त्यामध्ये फ्रीजमधील थंड पाणी ओता त्यामध्ये निवडलेली कोथिंबीर घालून वरतून बर्फाचे तुकडे घाला. तसेच पाण्यात 1-2 मिनिट बुडवून ठेवा. मग दुसरे पाणी घेऊन परत धुवून घ्या असे अजून एकदा करा.
एका स्वच्छ टॉवेल वर कोथिंबीर ठेऊन पुसून घ्या. मग बारीक चिरून घ्या. आता चिरलेली कोथिंबीर टॉवेल वर पसरवून 2 दिवस घरात सावलीत सुकवून घ्या. ड दिवस झाल्यावर पूर्ण वाळल्यावर हवा बंद डब्यात किंवा प्लॅस्टिक बॅगमध्ये भरून ठेवा. पण कोथिंबीर पूर्ण नीट सुकली पाहिजे नाहीतर त्याला बुरा येऊ शकतो.
आपल्याला पाहिजे तेव्हा जेव्हडी कोथिंबीर पाहिजे तेव्हडी काढून वापरा बाकीची परत तशीच ठेवा.