उन्हाळा आला की आपण वर्षभरासाठी साठवणीचे पदार्थ बनवून ठेवतो. त्यामध्ये साबुदाण्याचे पापड, पापड्या, बटाटा चिप्स किंवा पापड, कुरड्या, तांदळाचे पापड किवा पापड्या किंवा सालपापड्या ई. अश्या प्रकारे आपण पदार्थ बनवून ठेवले तर आपल्याला पाहिजे तेव्हा तळून खाता येतात.
तांदळाचे पापड किंवा पापड्या बनवायला खूप सोप्या आहेत तसेच झटपट होणाऱ्या आहेत. तांदळाचे पापड किंवा पापड्या आपण दोन प्रकारे बनवू शकतो. एक म्हणजे वाफवून किंवा शीजवून हे दोन्ही प्रकार छान लागतात. तसेच ते तळल्यावर तीचा साईज डबल होतो.
तांदळाचे पापड बनवताना त्यामध्ये जिरे व तीळ घातले आहेत त्यामुळे त्याची टेस्ट मस्त लागते.
The Marathi language Tasty Crispy Tandalache Steamed Papad in Marathi can of be seen on our YouTube Channel of Crunchy Durable Rice Flour Papad or Papdya
बनवण्यासाठी वेळ: 50 मिनिट
वाढणी: 25 पापड्या बनतात
साहित्य:
1 कप तांदळाचे पीठ
2 कप पाणी
½ टी स्पून जिरे
½ टी स्पून तीळ
एक चिमूट हिंग
1 टी स्पून मीठ
तेल प्लेटला लावण्यासाठी
कृती: एका बाउलमध्ये तांदळाचे पीठ, जिरे, तीळ, मीठ मिक्स करून त्यामध्ये पाणी घालून एक सारखे मिक्स करून घ्या त्यामध्ये गठुळी राहता कामा नये. मग बाऊलवर झाकण ठेवून 10-15 मिनिट बाजूला ठेवा.
पापड बनवण्यासाठी एक मध्यम आकाराचे स्टीलचे भांडे व त्यावरील भांड्याच्या मापाची 3 प्लेट घ्या. स्टीलच्या भांड्यात 2 कप पाणी गरम करायला ठेवा. स्टीलच्या तिन्ही प्लेटला थोडेसे तेल लावून घेऊन त्यावर 2-3 टी स्पून तांदळाचे मिश्रण घालून हळुवार पणे पसरवून घेऊन ती प्लेट गरम करायला ठेवलेल्या भांड्यावर ठेवा. मग त्या प्लेटवर झाकण ठेवा. मंद विस्तवावर 2 मिनिट तांदळाची पापडी वाफवून घ्या. दोन मिनिट झाल्यावर प्लेट खाली काढून थंड करायला ठेवा मग हळुवार पणे सूरीच्या सहयाणी पापडी काढून एक स्वच्छ कापडावर ठेवा. पहिली प्लेट काढल्यावर दुसरी प्लेट ठेवा. ती प्लेटपण दोन मिनिट गरम पाण्याच्या भांड्यावर ठेवा. दोन मिनिट झाल्यावर तिसरी प्लेट ठेवा. अश्या प्रकारे आलटून पालटून प्लेट ठेवा व पापड्या बनवून घ्या. तयार झालेल्या पापड्या कापडावर वळत घालून 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्या.
तांदळाच्या पापड्या वाळल्याकी तळून सर्व्ह करा.