महाशिवरात्री भगवान शिव ह्यांचा पावन पर्व आहे. दरवर्षी हा सण फाल्गुन कृष्ण पक्ष चतुर्दशी ह्या तिथि ला साजरा करतात. ह्या वर्षी 11 मार्च गुरुवार ह्या दिवशी महाशिवरात्री हा सण आहे. महाशिवरात्री ह्या दिवशी शिव भक्त त्यांची मनोभावे पूजा अर्चा करतात. महाशिवरात्री ह्या दिवशी जे भक्त मनोभावे पूजा अर्चा करतात त्यांची सर्व मनोकामना पूर्ण होतात. ह्या दिवशी पूर्ण दिवस उपवास करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा. भगवान शंकर ह्यांचा मंत्र जाप करावा.
The Marathi language video Maha Shivratri 2021 Shubh Muhurat, Puja Vidhi, Mantra
in Marathi can of be seen on our YouTube Channel Maha Shivratri 2021 Shubh Muhurat, Puja Vidhi, Mantra
महाशिवरात्री कहाणी किंवा कथा विडियोमध्ये सांगितली आहे त्याची लिंक पुढे देत आहे. Maha Shivratri Story
महाशिवरात्री ह्या दिवशी भगवान शंकर व माता पार्वती ह्यांचा विवाह संपन्न झाला. तसेच ह्याच दिवशी सृष्टि चा प्रारंभ झाला होता. पूर्ण वर्षात 12 शिवरात्री पैकी महाशिवरात्री हा महत्वाचा दिवस आहे त्यामुळे हा दिवस भारतभर अगदी उत्साहात साजरा करतात.
महाशिवरात्रि पूजा शुभ मुहूर्त
महाशिवरात्रि तिथि- 11 मार्च 2021 गुरुवार
चतुर्दशी तिथि सुरवात 11 मार्च 2021 दुपारी 2 वाजून 39 मिनट पासून
चतुर्दशी तिथि समाप्त: 12 मार्च 2021 दुपारी 3 बजकर 2 मिनट पर्यन्त
महाशिवरात्री पूजाविधी:
महाशिवरात्री ह्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून देवाची पूजा करून एक पाण्यानी भरलेला कलश ठेवावा. त्याच्या जवळ शंकर पार्वती ह्याचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. मग अक्षता, पान सुपारी, लवंग, इलायची, चंदन, दूध, दही, तूप, मध, गंगाजल, कमलगट्टा, धतुरा, बेल पत्र, कनेर अर्पण करावे. मग शंकर भगवान ह्यांची आरती म्हणावी.
महामृत्युंजय मंत्र
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्।।
महाशिवरात्रीसाठी करावयाचा मंत्र जाप
“ॐ नम: शिवाय” “शिवाय नम:
I have tried some. Very good recipes. Keep adding.👍