आपण होळी, पाडवा, दसरा किंवा कोणत्यापण सणवार ह्या दिवशी पुरणपोळी बनवतो किंवा घरी कोणी पाहुणे येणार असतील तर सुद्धा बनवतो. पुराण पोळी ही महाराष्ट्र मधील लोकप्रिय डिश आहे. पण आता प्रतेक प्रांतात लोकप्रिय झाली आहे.
पुरणपोळी ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. तसेच ती चवीष्ट सुद्धा लागते. पुरणपोळी बनवताना चनाडाळ व गूळ वापरुन नेहमी बनवली जाते पण काहीना चनाडाळ चालत नाही त्यांनी तुरीच्या डाळीची पुरणपोळी बनवली तरी चालते तुरीच्या डाळीची पुराणपोळी छान स्वादिष्ट लागते व ती पचायला हलकी असते.
The Marathi language Different style Maharashtrian Puran Poli Turichya Dalichi in Marathi can of be seen on our YouTube Channel of Easy to prepare Puran Poli for Holi festival with tips
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 8-10 पोळ्या बनतात
साहीत्य:
सारणासाठी:
2 वाट्या तुरीची डाळ
2 वाट्या साखर
½ टी स्पून वेलचीपावडर
¼ टी स्पून जायफळ
मीठ चिमूटभर
आवरणासाठी:
2 वाट्या गव्हाचे पीठ
2 टे स्पून मैदा
मीठ चवीने
2 टे स्पून तेल
तूप पोळीला लावण्यासाठी
पोळी लातण्यासाठी तांदळाची पिठी
कृती: एका बाउलमध्ये गव्हाचे पीठ, मैदा, मीठ व 2 टे स्पून तेल घालून मिक्स करून पाणी वापरुन पीठ मळून घ्या. पीठ मळताना फे सैल किंवा घट्ट मळू नका. मळलेले पीठ 2 तास झाकून बाजूला ठेवा.
प्रथम तुरीची डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये शीजवून घ्या. मग चाळणीवर काढून जास्तीचे पाणी निथळून जाऊ द्या. एका नॉन स्टिक पॅनमध्ये शिजवलेली तुरीची डाळ घेऊन त्यामध्ये साखर घालून मिक्स करून घ्या. मग मंद विस्तवावर मिश्रण घट्ट होई पर्यन्त शिजू द्या. साखरेचे मिश्रण जरा लवकर आटते त्यामुळे लक्ष ठेवून हलवत रहा. मिश्रण घट्ट झालेकी त्यामध्ये चिमूटभर मीठ, वेलची पावडर, जायफळ घालून मिक्स करून घ्या. पुराण झालेकी नाही कसे ओळखायचे तर पुरणामध्ये झारा उभा करून बघा जर तसाच उभा राहिला तर पुराण झाले समुजन विस्तव बंद करा.
पुरणपोळी बनवताना मळलेल्या पिठाचे मोठ्या लिंबा एव्हडे गोळे बनवून घ्या. त्याच्या डबल आकाराचे पुरणाचे गोळे बनवून घ्या. एक पिठाचा गोळा घेऊन त्याला वाटी सारखा आकार देवून त्यामध्ये पुरणाचा एक गोळा ठेवून हातानी गोल गोल हलवत गोळा बंद करून घ्या. मग तांदळाच्या पिठावर जाडसर पोळी लाटून घ्या.
नॉनस्टिक तवा गरम करून त्यामध्ये पुरणाची पोळी तूप लावून छान खमंग दोन्ही बाजूनी भाजून घ्या. अश्या प्रकारे सर्व पुराण पोळ्या बनवून घ्या. गरम गरम पोळी साजूक तूप लावून सर्व्ह करा.
टिप्स:
डाळ चांगली शिजू द्या. गव्हाचे पीठ 2 तास तरी भिजु द्या म्हणजे पोळ्या छान मऊ होतात.
पुराण फक्त साखर किंवा गूळ घालून किंवा साखर व गूळ घालून बनवता येते. थोडेसे मीठ घतले तर चव छान येते.
पोळी तव्यावर घतल्यावर सारखी उलटू नये नाहीतर फुटेल.
जर पुरण सैल झाले तर एका पातळ स्वच्छ कापडात पुराण काढून त्यातील जास्तीचे पाणी दाबून काढा. मग एका बाउल मध्ये काढून घ्या.
जर पुरण घट्ट झाले तर थोडेसे दूध किंवा काटाच्या पाण्याचा हात लावून मग पुरण मिक्स करून घ्या.