आपण ह्या अगोदर प्लेन लच्छा पराठा कसा बनवायचा ते पाहिले आता आपण मसाला लच्छा पराठा कसा बनवायचा ते पाहू या. मसाला लच्छा पराठा बनवायला अगदी सोपा आहे त्यालाच लेयर पराठा सुद्धा म्हणतात. अश्या प्रकारचा पराठा बनवताना त्यावर मसाला घालून बनवायचा आहे. टेस्टी लागतो आपण ब्रेकफास्ट किंवा जेवणात सुद्धा बनवू शकतो.
मसाला लच्छा पराठा आता सर्व ठिकाणी लोकप्रिय आहे. मैदा वापरुन सुद्धा पराठा बनवता येत पण फक्त मैदा वापरण्या पेक्षा आपण गव्हाचे पीठ व मैदा वापरुन तो पौस्टिक होईल. तसेच त्यामध्ये कसूरी मेथी वापरली आहे त्यामुळे टेस्टी लागते. मसाला घालून खूप छान लागतो.
The Marathi language Masala Lachcha Paratha in Marathi can of be seen on our YouTube Channel of Wheat Flour Masala Lachha Paratha Layered Masala Paratha
बनवण्यासाठो वेळ: 30 मिनिट
वाढणी: 6 पराठे बनतात
साहीत्य:
1 ½ कप गव्हाचे पीठ
½ कप मैदा
1 टे स्पून कोथिंबीर (चिरून)
1 टे स्पून तूप
1 टी स्पून मीठ
1 कप पाणी पीठ मळण्यासाठी
मसालासाठी:
1 टी स्पून चिली फ्लेस्क
1 टी स्पून कसूरी मेथी
1 टी स्पून धने-जिरे पावडर
¼ टी स्पून चाट मसाला
1 टे स्पून काळे तीळ
तेल वरतून लावण्यासाठी
कृती: एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये गव्हाचे पीठ, मैदा, मीठ, कोथिंबीर चिरून व तूप घालून मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये हळूहळू पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या. मग मळलेले पीठ झाकून 15-20 मिनिट बाजूला ठेवा.
मसाला बनवण्यासाठी: चिली फ्लेस्क, कसूरी मेथी, धने-जिरे पावडर, चाट मसाला मिक्स करून बाजूला ठेवा.
लच्छा पराठा बनवण्यासाठी मळलेल्या पिठाचे एकसारखे 6 गोळे बनवून घ्या. एक गोळा घेऊन मोठ्या आकारात लाटून घ्या. मग त्यामध्ये 1 टी स्पून तेल घालून पसरवून घ्या. त्यावर एक टी स्पून बनवलेला मसाला घालून एकसारखा पसरवून घ्या. आता आपल्याला ही पोळी फोल्ड करून म्हणजेच मुडपून घ्यायची आहे. प्रथम एका बाजूला थोडेशी फोल्ड करा आपण लहान मुलांचा पेपरचा पंखा कसा बनवतो तसा फोल्ड करायचा आहे. म्हणजेच झेड z सारखे पूर्ण फोल्ड करत जायचे आहे. पूर्ण फोल्ड झाल्यावर गोल वळवून घ्या शेवटचे टोक मध्ये थोडे दाबून घ्या. वरतून पीठ लावून लाटून घ्या. वरतून थोडे काळे तीळ घालून हळुवारपणे एक लाटणे फिरवा.
तवा गरम करून घ्या. तवा गरम झाल्यावर त्यावर बनवलेला पराठा घालून तूप घालून दोन्ही बाजूनी चांगला भाजून घ्या. अश्या प्रकारे सर्व लच्छा पराठा बनवून घ्या.
गरम गरम लच्छा पराठा सर्व्ह करा.