आता होळी हा सण आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रमध्ये देवाला नेवेद्य म्हणून पुराण पोळी बनवतात. आपण पुरणपोळी बनवताना नेहमी अगदी पारंपारिक पद्धतीने पुराण पोळी बनवतो. म्हणजे चनाडाळ, गूळ घालून शीजवून, घोंटून, पुराण वाटून बनवतो. पण त्यासाठी वेळपण जास्त लागतो. परत पुराण चांगले बनले तर पोळी मस्त खुसखुशीत बनते व फुटत नाही.
The Marathi language Different style Maharashtrian Puran Poli without rolling in Marathi can of be seen on our YouTube Channel of Easy to prepare Puran Poli for Holi festival
होळी ह्या सणाच्या दिवशी इन्स्टंट म्हणजेच झटपट पुराण बनवून त्यापासून बनवू या. ह्या पद्धतीने पुराण घोटायची गरज नाही, त्याच बरोबर लाटायची गरज नाही. त्यामुळे पोळी फुटायची भीती नाही. अगदी झटपट विना झंझट अगदी नवीन प्रकारे बनवू या. अश्या प्रकारची पुराण पोळी लहान मुले सुद्धा आरामात बनवू शकतील. पुराणपोळी ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 10 बनतात
साहीत्य:
½ कप चनाडाळ
¾ कप गूळ
½ टी स्पून वेलची पावडर
¼ टी स्पून जायफळ
1 कप गव्हाचे पीठ
¼ टी स्पून हळद
1 ¼ कप पाणी
मीठ चवीने
1 टे स्पून साजूक तूप
तूप वरतून लावण्यासाठी
कृती: प्रथम चनाडाळ स्वच्छ धुवून 2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवा. मग पाणी काढून मिक्सरच्या भांड्यात डाळ काढून घ्या. एक टे स्पून पाणी घालून वाटून घ्या. मग त्यामध्ये गूळ घालून बारीक वाटून घ्या. वाटलेले मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्या.
एका बाउलमध्ये गव्हाचे पीठ घेऊन त्यामध्ये चवीने मीठ व एक कप पाणी घालून मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये वाटलेले मिश्रण घालून मिक्स करून 10-15 मिनिट झाकून ठेवा. 15 मिनिट झाल्यावर त्यामध्ये वेलची पावडर, जायफळ, हळद घालून मिक्स करून थोडे पाणी घालून मिश्रण चांगले मिक्स करून घ्या. गुठळी होता कामा नये.
नॉन स्टिक पॅन गरम करायला ठेवा. पॅन गरम झाल्यावर त्यावर थोडेसे साजूक तूप लावून एक डाव मिश्रण सोडा पण मिश्रण पसरवायचे नाही ते आपोआप गोल आकार घेईल. मग बाजूनी थोडेसे तूप घालून खमंग असे दोन्ही बाजूनी भाजून घ्या. मंद विस्तवावर भाजा कारणकी आपण चनाडाळ फक्त भिजवून वाटून घेतली आहे त्यामुळे चांगली मंद विस्तवावर भाजून घ्या. भाजून झाल्यावर प्लेटमध्ये काढून घ्या. अश्या प्रकारे सर्व बनवून घ्या.
आपण अश्या प्रकारची पुराण पोळी कधी सुद्धा झटपट बनवू शकतो, सर्व जण आवडीने खातात.