आता उन्हाळा सीझन चालू झाला आहे. आपण ह्या अगोदर बरेच प्रकारचे आइसक्रीम कसे बनवायचे ते पाहिले. आइसक्रीम हे सर्वाना आवडते. तसेच ते आरोग्याच्या दृष्टीने हितावह सुद्धा आहे. त्यामुळे शरीरातील उष्णता सुद्धा कमी होते.
The Marathi language Bread Kulfi without Mawa or Gas in 5 minutes in Marathi can of be seen on our YouTube Channel of In 5 Minutes how to prepare Bread Kulfi without Gas for kids
कुल्फी हा पदार्थ कोणाला आवडत नसेल असे जगात कोणी सुद्धा नसेल. ह्या अगोदर आपण कुल्फी कशी बनवायची त्याचा विडियो पाहिला आता आपण झटपट 5 मिनिटांत कुल्फी कशी बनवायची ते सुद्धा बिना मावा/ खवा किंवा गॅस न वापरता.
ब्रेड कुल्फी बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. आपण बनवून बघा नक्की सर्वांना आवडेल.
बनवण्यासाठी वेळ: 5 मिनिट
सेट करण्यासाठी वेळ: 7 तास किंवा त्यापेक्षा कमी
वाढणी: 4 जणसाठी
साहीत्य:
1 ½ कप दूध (फूल क्रीम दूध)
4 ब्रेड स्लाईस
½ कप पिठीसाखर
¾ कप क्रीम
4-5 केसर काड्या (दुधात भिजवून)
½ टी स्पून वेलची पावडर
¼ टी स्पून जायफळ पूड
2 टे स्पून ड्रायफ्रूट (काजू/बदाम/पिस्ते)
कृती: फूल क्रीम दूध गरम करून थंड करून घ्या. ब्रेडच्या कडा कापून ब्रेडचे तुकडे करून घ्या. साखर बारीक करून घ्या. ड्रायफ्रूट चिरून घ्या.
मिक्सरच्या जूसरच्या भांड्यात ब्रेडचे तुकडे ब्लेंड करून घ्या. मग त्यामध्ये दूध, पिठीसाखर घालून परत ब्लेंड करून घ्या. आता त्यामध्ये फ्रेश क्रीम, वेलची पावडर, जायफळ पूड, थोडे काजू/बदाम/पिस्ते, केसर चे दूध घालून 5 सेकंद ब्लेंड करा असे 4-5 वेळा करा म्हणजे क्रीम छान फुलून येईल.
मग तयार झालेले मिश्रण कुल्फी मोल्डमध्ये ओता. जर कुल्फी मोल्ड नसतील तर पेपर कपमध्ये किंवा स्टीलच्या छोट्या ग्लासमद्धे किंवा छोट्या छोट्या कुल्फी मटकामध्ये ओता. मग 7-8 तास फ्रीजरमद्धे सेट करायला ठेवा.
ब्रेड कुल्फी सेट झालीकी प्लेटमध्ये काढून वरतून ड्रायफ्रूटन सजवून सर्व्ह करा.